फक्त अन् फक्त
वडार समाजाचाच विकास"
समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या समाजाला जोडण्यासाठी.
सदर गोलमेज परिषद ही वडार समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित आणून वडार समाजाच्या मुलभूत समस्येवर उपाय योजना तोडगा काढण्यासाठी.
चर्चा विनिमय सक्रिय प्रयत्नातुन शासन दरबारी समाजाच्या पुर्वीपासून रखडलेल्या योजना, रखडलेले ११ शासननिर्णय तरतुदी, ज्या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी वडार गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद: औरंगाबाद येथील हॉटेल मोदक, सिडको येथे रविवार दि.29 नेव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व वडार समाजातील बांधवांच्या उपस्थितीत पार पडली.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सेवा निवृत्त न्यायाधीश आर डी शेळके, औरंगाबाद सत्यशोधक धर्म परिषद चे अध्यक्ष हे लाभले होते. त्यांनी यावेळी उपस्थित राहुन समाज बांधवांना आरक्षणविपयी योग्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यिक श्री. टि एस चव्हाण हे होते.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वडार गोलमेज परिषदेचे महत्त्व परिषदेच्या माध्यमातून आयोजन उद्दिष्टे, समाजाला कायद्यातील सरंक्षण मिळावे, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वडार समाजातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांना सरकारने लक्ष घालून सोडवावेत. आरक्षणाचा लाभ स्वतंत्र रित्या मिळावे,विधानसभा व विधानपरिषद वडार समाजातील कमीत कमी पाच आमदार पद देण्यात यावे.वडार समाजाला स्वतंत्र आर्थिक महामंडळ देण्यात यावे.तांडासुधार योजना घरकुल योजना मिळावी.
वडार समाजातील लोकांना गायरान जमीन पाच एकर मिळवून द्यावी.
या प्रमुख मागण्यांसह बरेचसे मागण्यांचे मागणी प्रस्ताव वाचुन सादर करण्यात आला व सदर प्रस्तावास सर्व आलेल्या समाज बांधवांनी चर्चा करून अनुमोदन दिले.
तत्पुर्वी वडार समाज प्रतिनिधी स्वरुपात
मा.मनोहरराव मुधोळकर, सोलापूर.
मा.शामराव पवार, बुलढाणा.
मा.दिलीप जाधव, सांगली.
मा.सुनील चौगुले, कोल्हापूर.
मा.दयानंद इरकल, पुणे.
मा.शामराव विटकर, पुणे.
मा.भाऊलाल पवार, जालना.
यांनी आपले विचार मनोगत व्यक्त करताना सर्व बांधवांना गट तट विसरून नव्याने सर्व बांधवांना ,बुध्दी जिवी, तरुण, जेष्ठ या सर्वांना एकत्रित येण्याचं आवाहन केले असून एकत्रित आल्यावरच आपले आज तागायत न सुटलेले प्रश्र्न सुटण्यास मदत होणार असल्याचे चर्चेअंती स्पष्ट केले आहे.
या गोलमेज परिषदमध्ये तरुणांचा सहभाग बघता तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन समाजाला जोडण्याचे सामर्थ्य केवळ तरुण पिढीच करु शकते.या परिषदेच्या तरुणांच्या सहभागातून दिसून आले.
पुढील गोलमेज परिषद ही कोल्हापूर किंवा सांगली येथे जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात भरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. अशाच पद्धतीने चार ते पाच गोलमेज परिषदेचे आयोजन प्रत्येक विभागात घेण्याचे विचार सर्वानुमते ठरले आहे.व त्या त्या वेळी जे मुद्दे उपस्थित होतील ते सर्व मुद्दे शासनाकडे सादर करण्यात येतील असेही आलेल्या सर्व वडार बांधवांनी ठरवले आहे.
कोरोना महामारी व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सोशल डिस्टस्टिंग ठेवून सॅनिटराइजिंग करुन कार्यक्रमाचे आयोजन आयोजक श्री. सिताराम शेठ शिंदे उद्योजक, औरंगाबाद , यांनी केले तर या परिषदेचे निमंत्रक मनोहर मुधोळकर , सोलापूर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रोहिदास कुसळकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.दिपेश पिटेकर यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन श्री.कवी मच्छिंद्र धनवटे यांनी केले.
या परिषदेत सहभागी समाज बांधव
श्री.टि.एस.चव्हाण, औरंगाबाद.
श्री.पांडुरंग चौगुले, सोलापूर.
श्री.षण्मुखानंद दाते, सोलापूर.
श्री.प्रा.दिलीप जाधव, सांगली.
श्री. प्रा.सुनिल चौगुले, कोल्हापूर.
श्री. हरीश बंडीवडार पुणे .
श्री .अशोक सोनाजी पवार पुणे .
श्री.रमेश जेठे ,अहमदनगर
श्री .शामराव विटकर पुणे.
श्री. अशोक विटकर पुणे.
श्री. दयानंद इरकल ,पुणे.
श्री भाऊलाल पवार जालना.
श्री शामराव पवार बुलढाणा
श्री अशोक कुलाल, बुलढाणा
श्री.रमेश पवार, मुंबई.
श्री.सुरेश कुसळकर, औरंगाबाद.
श्री.रोहिदास कुसळकर औरंगाबाद.
श्री.मच्छिंद्र धनवटे औरंगाबाद
श्री.सचिन चव्हाण औरंगाबाद.
श्री.अशोक बंडगर औरंगाबाद.
श्री.दुर्गादास गुढे औरंगाबाद.
श्री.मनोहर विटकर, औरंगाबाद.
श्री.जगन्नाथ फुलारे औरंगाबाद.
श्री.बाळासाहेब चव्हाण, औरंगाबाद.
श्री.धनगर साहेब वाळुंज, औरंगाबाद.
श्री.गंगाराम नलावडे, इचलकरंजी.
श्री.बाबाजी धोत्रे, रत्नागिरी.
श्री.दत्तात्रय दंडवलकर औरंगाबाद.
श्री.दिलीप कुर्हाडे जालना.
श्री.जालिंदर चौगुले, औरंगाबाद.
आणि अन्य बांधव उपस्थित होते.
शब्दांकन- लेखन.
कवी/लेखक.मच्छिंद्र धनवटे,औरंगाबाद
https://m.facebook.com/story.php?story_fbid=184358300018394&id=101289968325228

