कागदपत्रांची पूर्तता असून ही ६ वर्षे पूर्ण झाले तरी लाभार्थ्यांना रमाई योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाली नाहीत.. म्हणून इंदापूर नगरपरिषदेवर धडक मोर्चा ..!!
प्रलंबित असणाऱ्या रमाई आवास योजना घरकुलासाठी लाभार्थ्यांचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा
इंदापूर: इंदापूर शहरातील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी "घरकुल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं"अशा घोषणा देत इंदापूर नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी इंदापूर नगरपरिषद यांनी सन २०१५ मध्ये इंदापुर शहरातील लाभार्थ्यांना प्रस्ताव तयार करून मागितले होते. शहरातील लाभार्थ्यांनी रमाई योजनेअंतर्गत घरकुलासाठी इंदापूर नगरपरिषदेला २०१५ मध्ये कागदपत्रांची पूर्तता केली होती. या प्रक्रियेला जवळजवळ ६ वर्षे पूर्ण झाले असून रमाई योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली नाहीत. त्यामुळे इंदापूर शहरातील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी "घरकुल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं"अशा घोषणा देत इंदापूर नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.
या योजनांतर्गत जोपर्यंत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत नाहीत तोपर्यंत इंदापूर नगरपरिषदेच्या निषेधार्थ दि. १८ फेब्रुवारी २०२१ पासून दि. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचे इंदापूर शहरातील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी सांगितले. तसेच दि.०१ मार्च २०२१ ते ०७ मार्च २०२१ पासून चक्री उपोषण करण्यात येणार असल्याचेही सांगितले. व उर्वरित मार्च महिन्यापासून नगरपरिषदेसमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल व यातच नागरिकांचे व लाभार्थ्यांचे काही बरेवाईट झाल्यास इंदापूर नगरपरिषद जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला. असे निवेदन इंदापूर नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर यांना देण्यात आले.
यावेळी संजय शिंदे, ॲड.किरण लोंढे, नानासाहेब चव्हाण, रोहित ढावरे, उमेश ढावरे, नागेश भोसले, संजय कांबळे, अक्षय मखरे, आझाद सय्यद, अनिल गोरे, पिनु राऊत, यादव ढावरे, आकाश अडसूळ, विकास शिंदे, बाळासाहेब ढावरे, सचिन ढावरे नागेश केंगार या सह महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या,

