shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रात सुराज्य आणने, हीच छत्रपतीना मानवंदना..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- 
शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचा स्वराज्याचा संकल्प छत्रपती शिवराय यांनी सिद्ध करून दाखवला. कारण जाणता राजा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि जनता यांच्यातील सेवाभाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे स्वराज्य होय. न्यायप्रिय राजा, महिलांचा सन्मान, शेतकरी, कामगार, मजूर, गरीब, वंचित पीडित, शोषित, दूर्लक्षित अशा सर्वच घटकांचा अत्यंत संवेदनशीलपणे विचार करून त्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा हा राजा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होत.
       

जय शिवराय या उच्चारात अपार शक्ति, ताकत, प्रेरणा आणि ऊर्जेचा खूप मोठा स्रोत आहे. कारण मातृभूमि बद्दल प्रेम, जनसामान्य बद्दल असलेला सेवाभाव, आपल्या मावळ्यांन बद्दल असलेला प्रचंड विश्वास, सकारात्मकता, उत्तुंग ध्येय, दूरदृष्टी, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण, शक्ती आणि बुद्धीचा योग्य समन्वय आणि 
आत्मविश्वास हाच शिवाजी महाराजांकडील कडील सर्वोच्च ताकत होती. याच ताकदीच्या बळावर स्वराज्याचे देखणे स्वप्न त्यांना प्रत्यक्षात साकार करता आले. म्हणूनच ते जानते राजे, रयतेचे राजे ठरतात. महाराजांचे जीवन म्हणजे महासंघर्ष आहे. रात्र वैऱ्याची होती. पावला पावला शत्रु उभा होता. अशा परिस्थितीमध्ये येणा-या प्रत्येक संकटावर अत्यंत नियोजनबद्ध आणि बुद्धिचातुर्याने त्यांनी मात केली आहे. कारण सुसंस्कार, सुविचार आणि प्रो ॲक्शन या त्रिवेणीचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होते. प्रो ॲक्शन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवून यश संपादन करणे. हे ज्यानां जमलं ते महापुरुष ठरतात. 
    
विकासाची पद्धत कोणती असली तरी मानव कल्याण हाच शिवरायाचा केंद्रबिंदू होता. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजा सारखे उत्तम व्यवस्थापन कुणालाही करता आले नाही. म्हणून आजही जगामध्ये मॅनेजमेंट गुरु म्हणून शिवाजी महाराजांचा अभ्यास केला जातो. अत्यंत वाईट, कमी साधन सामग्रीच्या माध्यमातून, अत्यंत कमी मनुष्यबळ असून सुद्धा एक दिवास्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात उतरणे. हे फक्त एकमेव द्वितीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी करून दाखवले आहे. शिवाजी महाराजांची प्रशासन कौशल्याचा वापर करून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पूर्ण केले‌. रयतेचे राजे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पगारी मावळे नव्हते, तर राज्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे होते. बादशहाकडे, मुघलांकडे सैनिक होते. या सैनिकांसाठी जय पराजय महत्त्वाचा नव्हता. कारण ती वेतन देऊन कामाला लावलेली माणसे होती. हा फरकच स्वराज्य निर्मिती मधील मैलाचा दगड ठरला होता. याला इतिहास साक्षीदार आहे. शिवाजी महाराजांनी देशातील पहिले आरमार उभे केले. तसेच व्यापारी नौदल आणि युद्ध नौदल ही उभे केले. म्हणजे त्यांच्याकडे किती दूरदृष्टी होती, हे लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या काळातही गुप्त खात होते. त्या गुप्त खात्याची जबाबदारी आदिवासी असलेल्या बहिर्जी नाईक यांच्याकडे होती. म्हणजे प्रशासनात जातीच्या नाही तर व्यक्तीच्या कर्तृत्वावर त्याची निवड केली जात होती. 
       
महाराष्ट्र या संकल्पनेत राष्ट्र हा शब्द शिवाजी महाराजांचा कार्यकर्तृत्वाचा इतिहास, त्यामागे शिवाजी महाराजांचे असलेली उत्तुंग दृष्टी या संदर्भाने आहे. कारण भारत देशात महाराष्ट्र राज्याच्या शब्दा मध्येच राष्ट्र हा शब्द आहे. आज कळतं पण वळत नाही, व्यवहार म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं जातं.‌ अत्यंतिक असलेली हाव आणि स्वार्थी स्वभावामुळे अनैतिकतेला आशीर्वाद, प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळत आहे. हे थांबले पााहिजे आणि शिवाजी महाराजांनी दिलेला वसा आणि वारसा आपल्याला पुढे चालवावा लागेल. खरंच स्वराज्याकडुन सुराज्याकडचा हा प्रवास योग्य पद्धतीने झाला तर जनतेचेही स्वप्न पूर्ण होतील. सर्वाँना समता, न्याय, हक्क आणि संधी मिळेल. यासाठी सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था  व जनता यांना एकत्र घेऊन संबंध मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून अविरत, प्रामाणिक आणि सेवाभावनेने कार्य करावे लागेल.
       
नैतिकतेला प्रोत्साहन आणि बक्षीस देणारे जाणता राजा कुठे ? आणि अनैतिकतेला आशीर्वाद, पाठिंबा आणि प्रोत्साहन देऊन नैतिकतेला मूठमाती देणारे जाण न नसलेले राजे कुठे ? शेतकऱ्यांची चिंता असणारे राजे कुठे ?आणि रोजच आत्महत्येमुळे शेतकऱ्यांच्या चिता पेटतानां पाहूनही असंवेदनशील वागणारे शेतकऱ्यांचे कैवारी कुठे ? चारित्र्य संपन्न व्यक्ती, समूहांमध्ये सुराज्य निर्मितीची क्षमता असते. म्हणून जगात सर्वात प्रथम महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाले हा सुवर्ण इतिहास आहे. आता देशात सर्वात प्रथम महाराष्ट्राला सुराज्य बनवणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे. जय जिजाऊ...जय शिवराय...! 

नैतिकतेला प्रोत्साहन आणि बक्षीस देणारे जाणता राजा कुठे ? आणि अनैतिकतेला आशीर्वाद, पाठिंबा आणि प्रोत्साहन देऊन नैतिकतेला मूठमाती देणारे जाण न नसलेले राजे कुठे ? शेतकऱ्यांची चिंता असणारे राजे कुठे ?आणि रोजच आत्महत्येमुळे शेतकऱ्यांच्या चिता पेटतानां पाहूनही असंवेदनशील वागणारे शेतकऱ्यांचे कैवारी कुठे ? चारित्र्य संपन्न व्यक्ती, समूहांमध्ये सुराज्य निर्मितीची क्षमता असते. म्हणून जगात सर्वात प्रथम महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाले हा सुवर्ण इतिहास आहे. आता देशात सर्वात प्रथम महाराष्ट्राला सुराज्य बनवणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे. जय जिजाऊ...जय शिवराय...! 

डॉ नागेश कराळे
९६३७४१३९१३
close