shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, मास्कविना फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!!

पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.  नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  तसेच    मास्कविना फिरणा-यांवर 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय, खासगी कार्यालयाच्या ठिकाणी संचार करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मंगल कार्यालये, सांस्कृतीक सभागृह, सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येवू शकतील. सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपहारगृहे अशा ठिकाणी संचार करताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

मास्कविना फिरणा-यांवर 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल केला जाणार जात आहे. आरोग्य निरिक्षकांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत.

कारवाई कडक होण्याच्या दृष्टीने हे अधिकार पोलिसांना पण देण्यात आले आहेत.  ही कारवाई कडक केली जाणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
close