shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथील सर्पमित्रांनी दिले जखमी नागाला जीवदान..!!

राहुरीराहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे 14 जून रोजी एक 5 फुट लांबीचा पूर्ण वाढ झालेला नाग रात्रभर पत्र्यामध्ये अडकून बसला होता तेव्हा तेथील नागरिकांनी सकाळी परिसरातील वन्यजीव प्रेमी अभी सांगळे यांना फोन करून बोलावले असता सांगळे यांनी जाऊन बघितले असता नाग मोठ्या प्रमाणात जखमी असल्याचे निदर्शनात आले.. 

सांगळे यांनी ताबडतोब राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीवप्रेमी कृष्णा पोपळघट यांना फोनवरून कल्पना दिली असता पोपळघट यांनी नागाला घेऊन वनविभाग कार्यालय गाठले व वनपरीक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे साहेब यांना परिस्थितीची माहिती दिली असता पोकळे साहेबांनी क्षणाचाही विचार नं करता पोपळघट यांना नागावर उपचार करण्यासाबंधी पत्र देऊन टाकळी मियाँ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे यांच्याशी संपर्क साधून नागावर उपचार करण्यासाठी सांगितले.




डॉ. वाकडे देखील लगेच तयारीला लागले. यावेळी पोपळघट यांच्या सोबत सर्पमित्र मुजीब देशमुख, अभि सांगळे, गुलाब शेख यांनी मोलाची कामगिरी बजावली.

जखमी नागावर 12 टाक्यांच्या अर्ध्या तासाच्या शास्त्रक्रियेसह डॉ. वाकडे यांनी आपले कौशल्य पणाला लावले.

शास्त्रक्रियेनंतर वनअधिकारी यांनी नागला बरे होईपर्यंत सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांच्या देखरेखखाली ठेवण्यासाठी सांगितले. नाग बरा होताच त्याला जंगलात मुक्त केले जाईल असे पोपळघट यांनी सांगितले.

सदर घटनेननंतर संपूर्ण तालुक्यातून या सर्पमित्रांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

यावेळी सहाय्यक वनपाल गायकवाड साहेब, परदेशी साहेब,  वनरक्षक निकम, ताराचंद गायकवाड यांचे देखील सहकार्य लाभले.
close