अहमदनगर प्रतिनिधी: निरज जेठे
देहरे - ग्रामपंचायतीच्या निवडणूकी नंतर अवघ्या चार महिन्यातच कारभार हाती घेतलेल्या नविन सरपंच , उपसरपंच व त्यांच्या सहकारी सदस्यांनी कामाचा धडाका लावला आहे.
गावातील मुख्य ड्रिनेज लाईनची स्वच्छता मोहीम असो की गावातील घनकचरा स्वच्छता असो. ग्रामपंचायत सर्वच कामाला लागलेली दिसते. गावात कित्येक दिवस हायमॅक्स बंद पडले होते ते दुरुस्त करून चालू केले . या शिवाय लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या प्रयानातून 4 सोलर हायमॅक्स , सौ. राणीताई लंके यांच्या जिल्हा नियोजन निधीतून ८ हायमॅक्स , डायनामिक्स डेअरी ते हनुमान मंदिर स्ट्रिट लाइट अशी कामे करून गावाला प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला आहे .
यापुढील काळात गावातील भागात हायमॅक्स व पथदिवे बसविण्यात येणार आहे . याशिवाय कपाळे वस्ती पिण्याच्या पाण्याची नविन पाईपलाईन , खंडोबा माळ पिण्याच्या पाण्याची लाईन , मळा १ व मळा २ यांना जोडणारा भरावीकरण रस्ता, कटारे सरांचे घर ते कानिफनाथ मंदिर काँक्रिटीकरण, पाखरे सरांचे घर ते ग्रामपंचायत गाळ्यापर्यंत काँक्रिटीकरण , आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मागासवर्गीय मुलांसाठी ओपन जिम , ग्रामपंचायत च्या मागील बाजूस बंदिस्त गटारअशी कामे चारच महिन्यात पूर्ण केलेली आहेत.
करंडे वस्ती पिण्याच्या पाण्याची लाईन, डांबरीकरण , खळवाडी येथे बंदिस्त गटार , दलित वस्ती बंदिस्त गटार , घन कचरा व्यवस्थापन अशी कामे लवकरच सुरु होणार आहेत. देहरे ग्रामपंचायतीने कोरोना मुक्त गाव व स्व. आर. आर. आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेमध्ये भाग घेतला असून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्पर्धा जिंकण्याचा मानस , सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी व्यक्त केला.

