shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिवंगत रत्नाकर मखरे(तात्या) यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिवंगत रत्नाकर मखरे(तात्या) यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
इंदापूर प्रतिनिधी:- (दि.१७) इंदापूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांचे निधन दि.१४ मे २०२१ रोजी झाले. दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट आज (दि.१७)रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी घेतली.
खा.सुप्रिया सुळेंनी रत्नाकर मखरे तात्यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याला उजाळा दिला.
खा. सुळे म्हणाल्या की,मखरे तात्या हे एक वादळी व झंझावाती व्यक्तिमत्व होते. मखरे तात्या आपल्या धाडशी, करारी व निर्भिड स्वभावाने परिचित होते. त्यांनी आयुष्यभर गरीब, पीडित,शोषित, वंचित, कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी काम केले. अशा शब्दात खा. सुप्रिया सुळेंनी दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरें बद्दल भावना व्यक्त केल्या.
यावेळी खा. सुळेंनी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला मखरे, पुत्र ॲड. राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे यांच्याशी चर्चा केली. चर्चे दरम्यान खा. सुळे म्हणाल्या की, पवार कुटुंबीय तुमच्या पाठीशी आहे. काळजी करु नका. राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे दिवंगत रत्नाकर मखरे यांच्यावर विशेष प्रेम होते. साहेबांनी मला आवर्जून सांत्वनपर भेट घेण्यासाठी सांगितले होते.असे यावेळी खा. सुळेंनी नमूद केले.
सांत्वन भेटी वेळी राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे (मामा), माजी जि.प.सदस्य.मा. प्रतापराव पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
close