नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणार्या ऑनलाइन निबंध स्पर्धा व चित्र लेखन स्पर्धंचे उद्घाटन दख्खनचा राजा जोतिबा व तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेते, सलीम जमादार यांच्या हस्ते करण्यात आले.
लॉकडाउन काळामध्ये निबंध स्पर्धेद्वारे बुद्धीला चालना मिळावी त्याचबरोबर कोरणा परिस्थितीमध्ये अनुभवलेले क्षण शेअर करता यावे या हेतूने नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सलीम जमादार म्हणाले की ज्याप्रमाणे कलाकार नेहमी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपली कला सादर करत असतो त्याच प्रमाणे पत्रकारांनाही नेहमी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये समाजाला तोंड द्यावे लागते. कोरोणा सारख्या परिस्थितीतही पत्रकारांनीही जिवाची पर्वा न करता आपले काम पूर्ण केले आहे, त्यामुळे सर्वच पत्रकार यांची कामे कौतुकास्पद आहेत, पत्रकार उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो सर्व ॠतु परस्थिती मध्ये सर्व वातावरणात परस्थितीशी झगडत असतो. त्याचबरोबर नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटना नेहमीच समाजहिताची कामे करत आहे, यापुढेही त्यांनी असेच समाजहिताची कामे करावी असे मत व्यक्त केले
यावेळी संघटनेचे नगर तालुका अध्यक्ष अन्सार शेख उपाध्यक्ष शिवा म्हस्के, सबिल शेख, महेंद्र भिंगारदिवे, रियाज पठाण श्याम कांबळे ,संजय वायकर, भारत पवार,अशोक तांबे, रवी कदम विजय घोगरे,रियाज शेख, रफिक शेख आदि पत्रकार उपस्थित होते.


