🌀➡️धरणात पाण्याची आवक सुरूच💦                              
राहुरी: तालुका प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील ज्ञानेश्वरसागर म्हणजेच मुळा धरण दक्षिण नगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या २६ हजार दशलक्षघफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मूळा (ज्ञानेश्वर सागर) धरणाचा आज रोजीचा पाणीसाठा मंगळवार (ता.२६) सकाळी ०६:०० वाजता १३,४७५ दशलक्ष घनफूट म्हणजे (५१.८२ टक्के) झाला आहे.

लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून ५,३२७ क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या पाणलोटात पाण्याची आवक आसली तरी लाभक्षेत्रात मात्र पावसाने दडी मारल्याचे दिसून येतं आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी ०६:०० वाजता धरणात १३ हजार दशलक्षघनफूट पाणीसाठ्याची  नोंद झाली आहे. सध्या धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक सुरू असल्या कारणानं मुळा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे.

महत्वाचं  म्हणजे धरणाच्या मागील गेल्या जवळपास 22 वर्षांच्या इतिहासात केवळ जुलै महिन्यातच हे धरण निम्मे भरण्याची ही बारावी वेळ आहे. तसेच ऑगस्टमध्ये तब्बल नऊवेळा धरण निम्मे भरलेले आहे. दरम्यान, मुळा धरणाचा पाणीसाठा जलदगतीने वाढत असल्याने धरणाच्या  लाभक्षेत्रातील असंख्य लाभधारक शेतकऱ्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले आहे. आणि त्या दृष्टीकोनातून आपले शेतातील पीकाचे पूर्वनियोजन केलेले आहे  तसेच ऊस लागवड क्षेत्र अजुन वाढण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.                                        
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , 📲7350591600