shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आगामी पंचवीस वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार...महेश चिवटे..!!



प्रतिनिधी : सचिन जव्हेरी 

करमाळा : (दि .२७) : करमाळा तालुक्यातील व शहरातील शिवसैनिक रुग्णसेवा करण्यासाठी कटिबद्ध असून तालुक्‍यातील कुठल्याही गरजू रुग्णाला कसलीही अडचण असेल तर त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करमाळा एसटी स्टँड मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मदतीचे सविस्तर माहिती देणाऱ्या माहिती फलकाचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एन नाईन टी फाईव्ह अशा उत्तम दर्जाच्या 1000 मास्क वाटप करण्यात आले 
एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना हे अत्याधुनिक मास्क देण्यात आले 

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शीलवंत युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष मयूर यादव शाखाप्रमुख समिर हलवाई शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड उपशहर प्रमुख पंकज परदेशी संजय भालेराव संतोष गान बोटे मोहम्मद ऑफिस रफी कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी बोलताना महेश चिवटे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्य कार्यप्रणालीवर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनता खुश आहे येणाऱ्या आगामी पंचवीस वर्षात मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब ठाकरे चे विराजमान राहणार आहेत यामुळे करमाळा तालुक्यातील प्रलंबित सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहेत मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून आज कमला देवी मंदिरात सर्व शिवसैनिकांनी महाआरती केली शेवटी कार्यक्रमाचे आभार शिवसेनेचे माझी शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी मानले.
close