मंत्री लबाड आहेत की एमडी मुजोर आहेत ? ... शिवराम पाटील..!!
प्रतिनिधी : संजय वायकर
जळगाव :(दि .२७ ) : एसटी खाजगीकरणाचा डाव महाराष्ट्र परवहन मंत्री ने घातलेला आहे.कदाचित सरकारचा असेल.त्या सरकार मधे कांग्रेस सहभागी आहे.आणि कांग्रेस तर खाजगीकरणविरोधात आहे.तर मग,कांग्रेस ने एसटी खाजगी करण्याच्या विरोधात भुमिका घेतली पाहिजे.
यासाठी आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने मा.नाना पटोले यांची मुंबई मुक्कामी भेट घेऊन विषयावर चर्चा केली.निवेदन दिले. एमडीचे आदेश दाखवले.साहेबांनी मनावर घेतले.ताबडतोब मुख्यमंत्री व परिवहनमंत्री ला लिहीण्याचे आदेश पीए ला दिलेत.ते पत्र अजून मला प्राप्त झाले नाही. तरीही यात पटोले साहेबांचे आम्ही आभार मानले.
राज्य परिवहन महामंडळाच्या एमडीने महाराष्ट्रात प्रत्येक डीसी ला १८-५-२०२१ला आदेश दिला कि,डेपोत खाजगी गाड्यांसाठी जागा करा.लवकर उत्तर द्या.म्हणून डीसीने डेपो मैनेजरला आदेश दिलेत कि,लवकर जागा द्या.
यानंतर आम्ही महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन चे आवाहन केले.पटोले साहेबांची भेट घेतली.नंतर १८-६-२०२१ला परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगार संघटनेसमोर जाहीर केले कि,यापुढे एसटी चे खाजगीकरण कधीच होणार नाही. पण सुरुवात तर केलीच ,ठाण्यात.
मंत्री म्हणतात खाजगीकरण नाही करणार. आणि एमडी आदेश काढतात. याचा अर्थ काय घेऊ?मंत्री लबाड आहेत कि,एमडी मुजोर आहेत. मंत्री चे ऐकत नाहीत. असा एमडी का धकवून घ्यायचा?
मला संशय येतो कि,मंत्री व एमडी यांची सांगड आहे.तुम्ही खाजगीकरणाचे काम सुरू करा.मी वरवर मनधरणी करतो.नाही करणार.म्हणजे असे तर सिनेमातील खलनायक सारखे चालू आहे.हम बलात्कार करेंगे लेकिन आपको कोई तकलिफ नही होने देंगे.
मा.नाही नाना पटोले साहेब,शिवसेना आणि राष्ट्रवादी सद्या तरी सत्तेवर मांड मांडून बसलेत. तेथे कांग्रेस चे थोरात,चव्हाण, राऊत कमी पडतात.म्हणून आपणास पुढे येण्याची गरज आहे. खाजगीकरणाचा अश्वमेध अडवण्याची गरज आहे.
पटोले साहेब आपणास मी नाहक उत्तेजित करीत नाही.आपल्या कडे प्रदेश अध्यक्ष पद वजनदार आहे.कांग्रेस च्या पायावर महाआघाडी ची खुर्ची टिकून आहे.आपण शेषनागासारखी थोडीही मान हलवली कि,महाआघाडी डगमग करायला लागेल.
पटोले साहेबांनी जर योग्य वेळी भुमिका घेतली तर कांग्रेस फक्त सत्तेसाठी नाही, जनहिसाठी सुद्धा आहे.असे समजतील.
मंत्री, आमदार, खासदार, आधिकारी यांचे फोन टैपींग केले तर खूप हंगामा केला.स्वताचे सस्पेन्स झाकून ठेवण्यासाठी इतका आकांडतांडव केला तर थोडासा एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही करा.एसटी सार्वजनिक असणे,सरकार ची असणे आम्ही सामान्य जनतेच्या हिताचे सुद्धा आहे.जे कांग्रेस ला मत देतील. निवडून आणतील. एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा मतदानाचा आधिकार आहेच.हे विसरून चालणार नाही.
मी या विषयावर संघटना व कर्मचारी बांधव यांच्या संपर्कात आहे.आम्ही पुणे येथे मध्यवर्ती ठिकाणी बैठक घेत आहोत.थोढा वेळ काढून आलात तर आम्हाला मदत होईलच.कांग्रेस जनसामान्यांची आहे,हे साबीत होईल.
महोदय,येत्या आठवडाभरात आपणास फुरसत असेल तर तसे नियोजन करू.आपण नाकारले तरी लढा चालूच राहील. वकील बदल होईल इतकेच.नेतृत्व बदल होईल.आम्ही संकटसमयी आपणास हाक देत आहोत.आम्ही तुमचे तर कधी कधी तुम्ही सुद्धा आमचे झाले पाहिजे.
महोदय, पटोलेसाहेब,आपण दखल घ्यावी. मनोगत कळवावे.
हि विनंती.
...शिवराम पाटील.
9270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच.

