प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि.२७/ करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील प्रवाशांच्या सेवेसाठी करमाळा आगार व्यवस्थापक यांनी आज पासून गौडरे ते अजेंठानगर ,पुणे हि एस टी बस वाहतूक चालू केली आहे.
सदरील एस टी बस वाहतूक चालू केल्याबद्दल आगार प्रमुख व कर्मचारी बांधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बापू नीळ यांनी मनःपूर्वक आभार मानले व एस टी बसची पुजा श्रीफळ वाढवून ज्येष्ठ नागरिक विठ्ठल जगदाळे, कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशिय संस्था अध्यक्ष राजेंद्र भोसले, विठ्ठल रोकडे, प्रकाश जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी एस टी चालक व वाहक प्रकाश कोपनर यांचेही स्वागत केले. यावेळी राजेंद्र रोकडे, दादासाहेब जगदाळे, आबा जगदाळे, युवराज जगताप, रमेश ढावरे, आनंद जगदाळे, बालाजी भोसले, रमेश चव्हाण व इतर प्रवाशी उपस्थित होते.

