shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार च्या वतीने ग्रामसेवकावर दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई ची मागणी-जगधने..!!

नारायणडोहो-प्रतिनिधी-रफिक शेख-
प्रहार संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष परसराम जगधने  यांनी देऊळगाव सिध्दी येथील ग्रामसेवकावर दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या कडे निवेदन देण्यात आले आहे.


ग्रामसेवक हे सतत गैरहजर राहतात व धनदांडग्याने अतिक्रमण केले आहे त्याला ग्रामसेवक मदत करतात आणि जनसामान्यांच्या  प्रश्ना कडे दुर्लक्ष करतात पाणी पुरवठा  आठ दिवस येत नाही व दिव्यांगाच्या 5% निधी वाटप करण्यात टाळाटाळ करतात. दिव्यांगाच्या प्रश्ना कडे दुर्लक्ष करतात. 

म्हणून ग्रामसेवकाची चौकशीची मागणी केली आहे. या पुढे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही गावातील जनसामान्यांच्या प्रश्नांकडे ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांनी दुर्लक्ष केल्यास प्रहार च्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल जनसामान्यांच्या व दिव्यांच्या पाठीशी  प्रहार खंबीरपणे उभी राहिल अशी प्रतिक्रिया  प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण पिंपळे , असे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे  प्रहार श्रीगोंदा युवक तालुकाध्यक्ष अशोक माळशिकारे प्रहार नगर तालुका कार्याध्यक्ष मा. परसराम जगधने यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
close