shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसिद्ध जोगेश्वरी मिसळ आता इंदापूर मध्ये... हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न.

प्रसिद्ध जोगेश्वरी मिसळ आता इंदापूर मध्ये... हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न.

स्पेशल मिसळ मध्ये जोगेश्वरी मिसळ इंदापुर मध्ये ब्रँड होणार- हर्षवर्धन पाटील

इंदापूर प्रतिनिधी: सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय जोगेश्वरी मिसळ आता इंदापुर मध्ये जिभेवर रेंगाळणाऱ्या झणझणीत चवीच्या स्पेशल मिसळचा आनंद जोगेश्वरी मिसळ या हॉटेलमध्ये मिळणार असून केसनंदनची अस्सल गावरान जोगेश्वरी मिसळ इंदापूरकरांच्या सेवेसाठी रविवार दिनांक २५ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
इंदापूर येथील महात्मा फुले चौक, बायपास कॉर्नर, पुणे- सोलापूर हायवे या ठिकाणी सदर जोगेश्वरी मिसळ हॉटेलची उभारणी महादेव वावरे व कुमार शिंदे यांनी केली असून उत्तम शेती बरोबर व्यवसायामध्ये आपले नाव  लौकिक करण्यासाठी दर्जेदार जोगेश्वरी मिसळ हॉटेल इंदापूर करांसाठी  सुरू केले आहे. इंदापुर मध्ये  इतर   ब्रँड असताना जोगेश्वरी मिसळ हा इंदापुर मध्ये ब्रँड ठरणार आहे असे उद्घाटन प्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  यावेळी म्हटले. जोगेश्वरी मिसळ चे महादेव वावरे ,कुमार शिंदे, हनुमंत शिंदे यांना या व्यवसायाबद्दल शुभेच्छा दिल्या.
दरम्यानच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या महिला पुणे जिल्हा अध्यक्षा कांचनताई कुल यांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी घनश्याम हाके अध्यक्ष धनगर समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, प्रकाश शिंदे ,पांडुरंग मारकड, पोपट शिंदे, शत्रुघ्न शिंदे, माऊली वाघमोडे, विष्णू पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन विजय जवळकर व इतर मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.
close