नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक उपस्थित नसल्याने या पुर्वी आढळून आले आहे. पंरतु वरिष्ठ अधिकारी संरपच, ग्रामसेवक यांचे घनिष्ठ साटेलोटे असल्याने कारवाई होत नाही अथवा केली जात नाही. हे दुर्दैव आहे.
गावातील चार दोन व्यक्तींना हाताशी धरून दडपशाही, मनमानी पद्धतीने कारभार चालु असल्याने अनेक गावांत जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सचिव जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. चार दोन व्यक्ती वाटेल तेव्हा वाटले तिथे कागदपत्रे मिळत असल्याने यात सामान्य माणूस भरडुन निघत आहे. जर या विरोधात कोणी आवाज उठवला तर गावातील नावाने फक्त प्रतिष्ठित पण ते कृत्याने गाव गुंड काम करणारे तक्रार अर्ज देणार्या नागरीकांना दमदाटी करून तो अर्ज मागे घेण्यास भाग पाडतात.
यामुळे यात ग्रामपंचायत कार्यालय सचिव तथा ग्रामसेवक यांचा फाजिल कामकाज करण्यासाठी आत्मविश्वास अधिक वाढत चाललेला आहे. यातुन गावातील सार्वजनिक बांधकाम,गटारकाम,पाणी पुरवठा योजना,रस्ते, पुलांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहेत.
या विषयी लेखी अथवा तोंडी तक्रार दाखल केली जाणार नाही याची काळजी घेतली जाते. याचा प्रत्यय देऊळगाव सिध्दी येथील गावात आला आहे. या विषयी प्रहार संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष परसराम जगधने यांनी देऊळगाव सिध्दी येथील ग्रामसेवकावर दंप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या कडे या विषयी लेखी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी साहेबांचे सक्त आदेश असताना देखील मुख्यालयात हजर राहत नसल्याने या विरोधात प्रहार संघटनेच्या माध्यमातून लेखी तक्रार दाखल केली आहे.
गावातील गावगुंडांनी अतिक्रमण केले असताना हि त्या व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे.त्यास ग्रामसेवक अंतर्गत मदत करून पाठीशी घालत आहे.आणि जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करुन धनदांडग्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असताना दिसत आहेत. इतर जनसामान्य माणसाच्या मुलभूत पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साधी दखल घेतली जात नाही.ही शोकांतिका आहे. गावात पाणी पुरवठा आठ आठ दिवस होत नाही. तसेच दिव्यांगाच्या व्यक्तीचा 5% निधी वाटप करण्यात टाळाटाळ केली आहे.
दिव्यांगाचे प्रश्ना कडे ग्रामपंचायत सचिव जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणून ग्रामसेवकाची खाते अंतर्गत चौकशीची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही गावात असे ग्रामसेवक असे कृत्य करताना आढळले तर प्रहार संघटनेच्या च्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी दिला.
नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या विषयी दखल न घेतल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण पिंपळे , प्रहार श्रीगोंदा युवक तालुकाध्यक्ष अशोक माळशिकारे, प्रहार नगर तालुका कार्याध्यक्ष परसराम जगधने यांची या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

