shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरूर च्या विकासाला नवसंजीवनी........!!

दिनांक : 28/07/2021. 
शिरूर : पुणे-शिरुर दुमजली उड्डाणपुलासाठी सात हजार कोटी मंजूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने पुणे -शिरुर या ६७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्रस्तावित दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी ७ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खा.कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश :- 
गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नगर रस्त्याचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी खासदार कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला होता.विजयी झाल्यानंतर पुणे – नाशिक रस्ता व पुणे – शिरुर रस्ता ही कामे आपल्या प्राधान्य यादीत असतील असे डॉ. कोल्हे सांगत होते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून पुणे – शिरुर रस्त्याच्या कामासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या. 

विविध पर्यायांचा विचार विचार करण्यात येत होता.दुमजली पुलासह आठ १८ पदरी रस्ते :- भूसंपादन करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दुमजली पुलांसह १८ पदरी रस्ते करण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. 
खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार ॲड. अशोक पवार यांच्याशी सल्लामसलत करून पवार यांनी अखेरीस दुमजली पुलांसह १८ पदरी रस्ते करण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर या रस्त्याच्या प्रस्तावाच्या कामाला गती मिळाली होती.

शब्दाच्या पूर्ततेचा आनंद :- खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, एखादा शब्द आपण मतदारांना दिल्यानंतर त्याची पूर्तता होते, त्याचा आनंद वेगळाच असतो. पुणे – शिरूर रस्त्याची वाहतूक कोंडी हा खूपच जटील प्रश्न होता. रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या प्रत्येक बैठकीत हा प्रश्न मांडला जात होता.शिक्रापूर, वाघोलीसह विविध ठिकाणची वाहतूक कोंडी हा चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी अनेक बैठका घेतल्या. विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

गडकरी व अजितदादांचे मी मनापासून आभार मानतो. या पुढील काळात हे काम लवकर व्हावे, यासाठी आमदार पवार आणि आपण जातीने लक्ष घालणार आहे. यावेळी शिरूर च्या विकासामध्ये आणखी भारीव मदत लागली तरी केली जाईल असे आमदार ऍड अशोक  बाप्पु पवार यांनी लोकांशी संवाद साधत असताना सांगितले.
close