प्रतिनिधी : संजय वायकर
अहमदनगर: ( दि .२८ ) : परवा मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेंचा चिपळूण दौरा झाला. सोबत आमदार भास्कर जाधव होते, ते आधी सेनेचे मग राष्ट्रवादीचे नंतर पुन्हा सेनेचे बनले.पण कंपनी चा चैसीस नंबर अजून सेनेचाच आहे.लोगो बदलत जातो फक्त.ज्या कंपनीचे प्रॉडक्ट असते,ते डिझाइन सहसा बदलत नाही. नारायण राणेंचा आक्रस्ताळेपणा अजून कुठे गेला? त्यांनी तर सेना,कांग्रेस, भाजप असे अनेकदा लोगो बदलले.शेवटी हे श्रेय निर्माती कंपनी ला जाते.
मुख्यमंत्री मा. ठाकरे हे पुरग्रस्त लोकासमोर हात जोडून उभे राहून ऐकत होते. त्यांनाही सांगितले कि,तुम्ही हात जोडू नका.हे आपलेच गुलाम आहेत.जातील कुठे?उलट यांनीच तुमच्या पाया पडले पाहिजे.
या गर्दीतून एक कापड दुकानदार महिला नुकसानी बद्दल आक्रोश करीत होती.मुख्यमंत्री आलेच तर रडगाणे मांडत होती.मुख्यमंत्री ऐकून घेत होते.मधेच भास्कर जाधव त्या महिलेला थांबवत होते.तिच्या मुलाला सांगत होते.तुझी आईला आवर, तरीही ती महिला ऐकत नव्हती .म्हणून तर जाधवांनी सरळ हात उगारतांनाचे चित्र आख्खा महाराष्ट्राने पाहिले, ते चित्र छेडछाड केलेले नसेलच.
येथेच नागरिक आणि नेता यामधील मोठा फरक जाधवांनी दाखवून दिला.सत्ता मिळाली कि माणूस रावण बनतो. हे आम्हाला कळत असूनही थोडासा फायदया साठी आम्ही त्याच त्याच माणसाला निवडून देतो. दर पांच वर्षांनी निवडून हिच मुळात आमदार, खासदार बदलण्यासाठीच असते.पण आम्ही मुर्ख माणसे त्या संधीचा फायदा घेत नाहीत. फक्त पांचशे रूपये घेतो. निवडणूक चा हेतू म्हणजे फक्त पांचशे रूपये ,हाच हेतू मुर्ख, भिकारडा मतदारांचा असतो.असा मुर्ख आणि भिकारडा माणूस लोकशाहीचा मारक असतो. शत्रू असतो.खरे म्हणजे लोकशाही ची रचना त्या मुर्ख व भिकारडा माणसासाठीच असते.पण फक्त कटोरी हेच त्याचे साधन समजून लोकशाहीचा नाश करतो.
परवा त्या महिलेवर जाधव खेकसले.हात उगारला आणि त्या महिलेपेक्षा इतरांना ते जास्त खटकले.पेपर ला,टिव्हीला, सोशल मेडियावर जाधवांचा निषेध झाला. त्यांना ते कळले,कळले म्हणजे नाईलाजाने. दणका बसल्यावरच,आणि जाधव त्याच चिपळूणला,त्याच गल्लीत जाऊन त्या महिलेची माफी मागितली. म्हणे ती माझी बहिण आहे.आणि तो पोरगा माझा भाचा आहे.काय भास्करराव?तुम्ही लोकांना मुर्ख समजतात का?अहो,ती तुमची बहिण असती तर ती अशी दुसऱ्याने दिलेले कपडे घालून रडली नसती.तुम्ही तिला नवीन कपडे,गाडी वगैरे पुरवून मुख्यमंत्रीची भेट घालून दिली असती. आणि म्हणे,माझी बहिण?
असे मुजोर आमदाराला त्या जिल्ह्यातील लोक कसे पेलत असतील? मोठा गंभीर प्रश्न आहे,आणि ते म्हणे विधानसभा अध्यक्षाची खुर्ची बळकावणार आहेत.
यातील खरी गोम तर आम्ही मतदारात आहे.त्या महिलेला लोकांनी साथ दिली.पाठीशी घातले.आणि ती बया म्हणाली, ते माझ्या भाऊसारखे आहेत.आमची नेहमीच मदत करतात.असे का म्हणाली असेल? आपण दुकानदार. हा भाऊ आमदार. तो ही शिवसेनेचा.आणि मुख्यमंत्र्यांना बगलेत घालून फिरत आहेत.उगीच यांच्या विरोधात बोलले तर होणारे काम बिघडेल.मिळणारी मदत अडकून जाईल.बोलला काय आणि हाणले काय?आपल्याला कुठे भोकं पडलीत? पण कटोरी खाली राहिल,त्याचे काय? नको बाबा. भीक हवी असेल कुत्रा सहन करा.हेच शहाणपणाचे.
जळगाव येथे सादरेंनी आत्महत्या केली.त्यांच्या पत्नी ने खडसेंवर आरोप केला.लोकांनी त्या विधवेला साथ दिली.न्यायासाठी. आंदोलने, उपोषणे केली.खडसेंनी त्यांचेवर गुन्हे दाखल केलेत.अजून तारीख पे तारीख चालू आहे,आणि आश्चर्य !त्या बयेने घुमजाव केले.म्हणे खडसे साहेब खूप सज्जन, दयाळू माणूस आहे.त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्यांचेवर चुकीने आरोप केला गेला.तो आरोप मागे घेते.का?त्या बयेला फंड,पेन्शन, ग्रैच्युएटी,अनुकंपावर नोकरी पाहिजे होती.कटोरी भरली.तक्रार उलटवली.बहिण धन्य जाहली.भाऊ,मुजरीम हाजीर हो!
असे कटोरी धारक लोकांमुळे मुजोरी लोकांना फावते.ते शेर बनतात.पुन्हा नवीन शिकारीला निघतात.आणखी नवीन कटोराधारक त्यांच्या जबड्यात सापडतो.
...शिवराम पाटील.
9270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच.

