shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साळुंकी पक्षास मिळाले जीवदान...पत्रकार काकासाहेब मांढरे यांची दक्षता..!!

साळुंकी पक्षास मिळाले  जीवदान...पत्रकार काकासाहेब मांढरे यांची दक्षता. 

इंदापूर : प्रतिनिधी इंदापूर येथील पत्रकार काकासाहेब मांढरे यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या साळुंकी पक्षास जीवदान मिळाले.   

यापूर्वीही त्यांनी एका वृद्ध नागरिकाला माणुसकीच्या नात्याने  भरकटलेलं वृद्ध व्यक्ती 
आधार देऊन त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दोन दिवस सांभाळून दिले होते.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, काकासाहेब मांढरे हे रविवारी (दि. २५ ) जुलै रोजी सकाळी अरण (ता. माढा) येथून आपल्या शेतीचे काम उरकून कालठण नं.१ (ता. इंदापूर) या आपल्या गावाकडे परत येत असताना सोलापूर-पुणे महामार्गावरुन मोटारसाईकल वरुन येत असताना अरण गावाच्या पुढे आले असताना अचानक महामार्गावरती मध्येच एक लांडी पक्षी तडफडत असताना त्यांनी पाहिले.याठिकाणी वाहनांची ये-जा सुरुच होती. क्षणात त्यांनी आपली मोटारसाईकल उभी करुन पक्षास पटकन उचलून बाजूला घेतले व पाहिले असता त्या पक्षास वाहनाची धडक बसून त्याच्या पायाला व पंखाला जखम होऊन त्यातून रक्त येत होते. त्याला झालेल्या जखमेमुळे त्याला उडता व चालता ही येत नव्हते. त्यांनी रस्त्यातून बाजूला करुन उपचारासाठी स्थानिकांकडे सुपूर्द केले. व पुढे मार्गस्थ झाले.

 खरंच रस्त्यामध्ये प्राणी व पक्षी मेलेले अवस्थेमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसलेले आढळतात परंतु जखमी अवस्थेमध्ये ते त्या प्राण्यास व पक्षास जर वेळीच इलाज केला तर ते वाचू शकतात म्हणून प्राणीमात्रांवर दया करा उक्तीप्रमाणे आपण अशा वेळी अशा प्रकारचे काम केले तर जखमी झालेल्या अशा अनेक पक्षांना प्राण्यांना जीवदान मिळेल असे  मांढरे यांना विचारले असता सांगितले.

काकासाहेब मांढरे यांच्या दक्षतेमुळे एका जखमी पक्षाला वेळेवर उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला.
close