शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी दहाच्या सुमारास लागली आहे. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले की, नगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये १७ रूग्णांपैकी सात रूग्णांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता वॉर्डामध्ये ही आग लागली.
ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तातडीने अधिकाऱ्यांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

