shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रक्तदान शिबिरात ४८८ विक्रमी रक्त पिशव्यांचे संकलन .आयुष्यात काम करताना पुढच्या माणसाचे मन जाणण्याचा प्रयत्न केला की नक्की त्याचा फायदा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही - ना भरणे.अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी दाखवली उपस्थिती.


अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रक्तदान शिबिरात ४८८ विक्रमी रक्त पिशव्यांचे संकलन .

आयुष्यात काम करताना पुढच्या माणसाचे मन जाणण्याचा प्रयत्न केला की नक्की त्याचा फायदा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही - ना भरणे.


अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी दाखवली उपस्थिती.
इंदापूर प्रतिनिधी:आमचे मेंबर मित्र परिवार इंदापुर यांच्या वतीने अनिल अण्णा पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्त भव्य रक्तदान सोहळा दिनांक ७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला.  या रक्तदान शिबिरास इंदापूर पुणे, टेंभुर्णी,  अकलूज, विविध भागातून आणि तालुक्यातील तरुणांनी उपस्थिती दर्शवून ४८८ रक्तपिशव्या यांचे संकलन मुक्ताई ब्लड सेंटर यांच्यावतीने करण्यात आले. सदर रक्तदात्यास प्रमाणपत्र व जर्किंग देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यारक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळीच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 
रक्तदान शिबिरात पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग दिसून आला.तसेच अभिष्टचिंतन सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वडार पॅंथरचे अध्यक्ष दयानंद इरकल, बहुजन मुक्ती पार्टी चे महासचिव राहुल मखरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, शिवसेना शहराध्यक्ष महादेव सोमवंशी, राजकुमार धोत्रे या  मान्यवर यांच्या उपस्थितीत अनिल पवार यांचा केक कापून अभिष्टचिंतन सोहळा चा सत्कार समारंभ साजरा करण्यात आला.
 यावेळी शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, प्रताप पाटील,रमेश पवार, रविराज पवार ,तानाजीराव धोत्रे, नगरसेवक पोपट शिंदे, अमर गाडे, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, विजय चोरमले विष्णू पवार, पिंटू म्हसवडकर,पिंटूशेठ घोडके, रोहिदास पवार, दुर्गा शिंदे, लखन चौगुले, अनिल चौगुले, बाबासाहेब विटेकर ,आकाश जाधव, गौरव चौगुले, शिवाजी चव्हाण, किसन चौगुले इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले की ,कोरोनाचे खूप मोठे संकट असूनही रक्ताचा तुटवडा जाणवत असताना हा तुटवडा भरून काढण्यासाठी शासनाच्या वतीने खूप प्रयत्न चालू आहेत. हीच आपली गरज ओळखून अनिल पवार आणि आमचे मेंबर मित्र परिवार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार मानतो.ते पुढे म्हणाले की, अण्णा काम करताना एक सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करायचे. त्या माणसाला आपण सहकार्य केले तर तो माणूस आयुष्यभर विसरत नाही .मोठ्या माणसाला मदत केली तर तो कदाचित विसरेल पण तेच एकाद्या झोपडीतल्या माणसाला सहकार्य केले तर तो आयुष्यभर विसरत नाही. या दृष्टीने तुझे कामकाज चालू आहे.काम करण्याची संधी मिळाली तर  ते काम करून जे सुख आशीर्वाद मिळते ते खुप मोलाचे असते. आयुष्यात काम करताना पुढच्या माणसाचे मन जाणण्याचा प्रयत्न केला की नक्की त्याचा फायदा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही.  दिवस येतात, दिवस जातात काळ कोणासाठी थांबत नाही त्या काळाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. एखादे काम नाही झाली तरी चालेल पण प्रयत्न केला पाहिजे. किमान प्रयत्नातून सुद्धा ज्या कामासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या प्रयत्न मुळे त्या माणसाचे प्रेम आपुलकी जपता येते. व त्यातून समाधान मिळते. जीवनात आनंद द्यायचा आनंद घ्यायचा असतो. चांगली काम करत असताना खूप अडचणी येत असतात परंतु त्या पार करून काम करायचे असतात. अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून अनिल पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवाजी चव्हाण, संजय (डोनाल्ड )शिंदे, तानाजीराव धोत्रे, महादेव सोमवंशी, संजय सोनवणे ,राहुल मखरे ,अनिकेत वाघ, बाळासाहेब ढवळे ,दयानंद इरकल या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.तर प्रस्ताविक भाषण अनिल पवार यांनी  केले.

दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, दीपक जाधव, शेखर पाटील तसेच इतर मान्यवर यांनी अनिल पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

अनिल पवार यांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्याबद्दल जनतेत असलेली आपुलकी आज त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रेमातून दिसून आले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' समाजामध्ये काम करण्याची जिद्द आणि चिकाटी अनिल पवार यांच्यामध्ये असून ते होतकरू व जिद्दी आहेत. रक्तदान शिबिराचा हा उपक्रम स्तुत्य असून रक्तदाता हा अनेक अर्थाने श्रेष्ठ ठरतो.
close