shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक पतसंस्थेच्या व्हा चेअरमनपदी जयप्रकाश कांबळे यांची निवड.

शिक्षक पतसंस्थेच्या व्हा चेअरमनपदी जयप्रकाश कांबळे यांची निवड.
*इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या व्हा चेअरमन वसंत फलफले यांनी राजीनामा दिल्याने रीक्त जागी संचालक जयप्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली.विद्यमान चेअरमन वसंत फलफले यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.निवडून निर्णय अधिकारी श्रीम एस एस कदम यांनी जयप्रकाश कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने व्हा चेअरमनपदी जयप्रकाश कांबळे यांची निवड झाल्याचे जाहिर केले.
पतसंस्थेच्या व सभासदांच्या हिताचे निर्णय घेवून पतसंस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे व्हा चेअरमन जयप्रकाश कांबळे निवड झाल्याबद्दल यांनी सांगितले.यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष तथा पतसंस्थेचे माजी चेअरमन ज्ञानदेव बागल , माजी चेअरमन ज्ञानदेव चव्हाण, विलास पानसरे , बापूराव राऊत , लतिफ तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केली.प्रसंगी पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक हरिश काळेल , सुनिल वाघ , किरण म्हेञे , संभाजी काळे , नितिन वाघमोडे , विलास शिंदे , सुनंदा बोके , सुनिल चव्हाण , गणेश सोलनकर , सुरेश माने , सिद्धार्थ चव्हाण , सुनिल शिंदे , भारत ननवरे , बापूराव जाधव , दिलीप पोळ , नितिन कदम , विकास वाघ , राहुल जगताप , शहाजी पोफळे उपस्थित होते.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले.आभार सचिव संजय लोहार यांनी मानले.*

close