प्रतिनिधी । शिर्डी :-
ओबीसींची झालेली हानी भयंकर, ह्यात महाविकासआघाडीने हेतुपुरस्सर खेळ चालवलेला आहे, असा घणाघाती आरोप भाजपा उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देतांना सदर आरोप केला आहे.


ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही तर विषय ओबिसी समाजाच्या अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढायला हवे परंतु महाविकासआघाडी मार्ग काढण्याचे कुठले हि काम करत नाही असे दिसते. वेळोवेळी निवडणुकीच्या वेळी ह्या संदर्भातील आदेश येऊन ओबिसीचे राजकिय नुकसान महाविकासआघाडी सरकार करत आहे. असे गोंदकर यांनी व्यक्त केले..


ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे तसेच राज्य सरकारच्या अध्यादेशाला न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. ह्यामुळे महाविकासआघाडी सरकारने ह्या ओबिसी  राजकिय नुकासानीला थांबवण्यासाठी मार्ग काढण्यासाठी काम करावे. ओबिसी समाजाचे चालवलेले नुकसान थांबवावे असे हि राजेंद्र गोंदकर कार्यक्रमात म्हणाले.