shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओमायक्रॉनच्या संकटामुळे शाळा होणार का बंद❓

 शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१.

अहमदनगर : ओमायक्रॉनच्या संकट वाढत चाललेले आहे. राज्यातील अऩेक  भागात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येऊ लागलेले आहे. त्यामुळे आता शाळा सुरु ठेवयाच्या की बंद ठेवायच्या यावर खल सुरु असला तरी शाळा बंद करून ऑनलाईन अध्यापन सुुरु करावे, अशी मागणी होत आहे. 
स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे.  
टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे.  या पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.  

प्रशासनाकडून कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचे नियोजन झालेले आहे. परंतु सध्या पालक आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालायला तयार नाहीत. शाळांमध्ये शिकवतात तसेच ऑनलाईन धडे द्यावे व तूर्त शाळा बंद ठेवाव्यात, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त केली जात आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close