shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डिसेंबर महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे ' हे दोघे ' आयडॉल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१ 
 
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे.
यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदविचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येतो तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्याच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालयावर, संशोधन केंद्रावर आणि कृषि विज्ञान केंद्रावर लावण्यात येतो. जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषि महाविद्यालयांना, कृषि संशोधन केंद्रोना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, सरकारी अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.

डिसेंबर 2021 या महिन्याकरीता आयडॉल म्हणुन मानोरी ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील कृषिभूषण डॉ. दत्तात्रय सहदेव वने व कृषि उद्योजक म्हणुन राहुरी विद्यापीठातून जीवरसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या सोनकसवाडी पो. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे येथील कृषि उद्योजीका सौ. स्वाती अरविंद शिंगाडे यांचा समावेश आहे. डॉ. दत्तात्रय वने यांनी सन 1991 पासून तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करुन हरभरा, गहू, कांदा, भुईमूग, सोयाबीन या पिकांची शास्त्रीयदृष्ट्या लागवड केली आहे. त्यांनी मानोरी येथे फार्मर्स क्लब व दीपस्तंभ बचतगटाची स्थापना तसेच दीपस्तंभ ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे.
कृषि उद्योजिका असलेल्या सौ. स्वाती शिंगाडे यांनी हायटेक शेतीचे नियोजन करुन कृषि उद्योजीका म्हणुन यशस्वी भरारी मारली आहे. त्यांनी अभिनव प्राप्ती फार्मस क्लब, प्युअर ऑरगॅनिक सेंद्रिय गट, हायटेक फ्लोरीकल्चर, हायटेक फुलशेती प्रशिक्षण केंद्र इ. ची स्थापना करुन सेंद्रिय उत्पादनाचा स्वतःचा ब्रॅण्ड विकसीत केला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close