शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१
खडांबे : राहुरी तालुक्यातील खडांबे बु ता. राहुरी येथील कै. माणिक उर्फ भास्कर काचोळे यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
भास्कर काचोळे हे व्यक्तिमत्त्व अतिशय चांगले, दयाळू आणि सहकार्याचे होते. गावातील सामाजिक, राजकीय, क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते कार्यरत होते. राहुरी तालुक्यातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना संघटित करून त्यांनी न्याय मिळवून दिला होता व जे प्रकल्पग्रस्त नोकरी पासून वंचित आहेत त्या विद्यापीठ प्रकल्पग्रस्त व कृती समितीला भास्कर काचोळे नेहमी मार्गदर्शन व सहकार्य करीत होते.
त्यांना स्थानिक लोकबाबत खूप आदर होता. तसेच एक सच्चा शिवभक्त हरपला असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त कृती समितीचे तालुका संघटक सम्राट लांडगे यांनी खंत व्यक्त केली व भास्कर तात्या गेल्याचे गावालाच नाही तर संपूर्ण राहुरी तालुक्याला दुःखद धक्का बसला आहे. रुबाबदार, धाडसी व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही असे अध्यक्ष संतोष पानसंबळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पाश्चत आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचे वडील नानासाहेब काचोळे हे एक प्रगतशील शेतकरी आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

