वडापूरी येथे श्री दत्तगुरु मंदिर रेडा ते गाणगापूर दिंडी सोहळ्याचे स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी येथे श्री दत्तगुरु मंदिर रेडा ते गाणगापूर दत्त जन्मोत्सव दिंडी सोहळा पालखीचे स्वागत श्रीनाथ पाणीपुरवठ्याचे उपाध्यक्ष हरिभाऊ माने यांच्यावतीने (दि.६) रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले.
यावेळी युवा उद्योजक प्रीतम देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभहस्ते पालखीच्या पादुकांचे व तुळशीचे पूजन करण्यात आले.
श्री दत्तगुरु मंदिर रेडा येथून ते गाणगापूर दत्त जन्मोत्सवा निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन दिंडी चालक व मार्गदर्शक ह .भ .प. उमराव महाराज देवकर रेडा, नियोजन व सचिव विष्णू कोकाटे सराटी, बापूराव जाधव पळसमंडळ यांच्या नियोजनाखाली गाणगापूर मुक्काम स्थळ श्री विश्वेश्वर महाराज आश्रम संगम रोड नदीकाठी गाणगापूर या ठिकाणी दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी हे दिंडी पोचणार आहे.
या दिंडीचे प्रस्थान आज दिनांक ६ डिसेंबर रोजी झाला असून आजचे दुपारचे अन्नदान वडापुरी गावचे हरिभाऊ माने यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी वडापुरी व परिसरातील भाविक यांनी पालखीच्या पादुकांचे दर्शन घेतले. व प्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी उपस्थित भाविक भक्तांना दिंडी चालक उमराव महाराज यांनी प्रवचना द्वारे गुरुभक्ती चे महत्त्व सांगितले. तसेच ही दिंडी आज संध्याकाळी बाभूळगाव येथे मुक्कामास असून ७ डिसेंबर रोजी ही दिंडी सकाळी गाणगापूर कडे मार्गस्थ होणार आहे. या दिंडीमध्ये सध्या ६० ते ७० भाविक असून पुढे १०० भाविक या दिंडीमध्ये दाखल होतील. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त पोस्टमन विलास नलवडे व इतर भाविक उपस्थित होते.

