शिर्डी । प्रतिनिधी : :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रिय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका योजनेत तालुक्यातील दिव्यांगांचे नावे समाविष्ठ करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. 

शिर्डी शहरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेटी घेऊन तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा केली असून फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी दिव्यांग बांधवांसाठी राष्ट्रिय अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका योजनेमध्ये नावे समाविष्ट करून त्यांच्या उपजीवेकासाठी महत्वपूर्ण ठरणारा अध्यादेश पारित केला आहे. परंतु नगर जिल्हयात राहाता तालुक्यात अजूनही या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आपण सहानुभूतीपूर्वक या विषयात लक्ष घालून या दिव्यांग बांधवाना न्याय द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.