shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशावरती आलेले हे कोरोनाचे संकट लवकर दूर होवो - राज्यमंत्री दत्तात्रय भरणेबोरी गावच्या ग्रामदैवत असलेले 'जोरी देवस्थान व नागवे देवस्थान या मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेऊन केली प्रार्थना.

देशावरती आलेले हे कोरोनाचे संकट लवकर दूर होवो - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

बोरी गावच्या ग्रामदैवत असलेले 'जोरी देवस्थान व नागवे देवस्थान या मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेऊन  केली प्रार्थना.
इंदापूर प्रतिनिधी:देशावरती आलेले हे कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोरी गावच्या ग्रामदैवत असलेले 'जोरी देवस्थान व नागवे देवस्थान या मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेऊन प्रार्थना केली.
इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे खंडोबा देवस्थानची यात्रा ही तीन दिवस असून त्याची सुरुवात दि. ७ जानेवारी रोजी शुक्रवारी झाली असून गावाच्या वतीने पहिल्या दिवशी देवकार केले जाते तर दुसऱ्या दिवशी श्री खंडोबा देवाचे लग्न सोहळा केला जातो . तिसऱ्या दिवशी देव दर्शन करून यात्रेचा आनंद लुटला जातो. या तीन दिवसांमध्ये वर्षभर बाहेर गावी व वाडीवस्तीवर असणारे सर्व गावकरी लेकी - बाळा यात्रेला हजेरी लावतात आणि आपला स्नेह बंध जपतात अशा या यात्रेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दर्शन घेऊन देवाची प्रार्थना केली आणि यात्रेतील गरम वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला तसेच मुलांशी गप्पागोष्टी करीत मन मोकळे केले.
 यावेळी गावातील नागरिक मान्यवर व ग्रामस्थ यात्रेकरू उपस्थित होते.
close