सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे करण्यात आले आवाहन
प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
नारायणडोह : ८ / नगर तालुक्यातील नारायणडोह येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने श्री. चांगदेव विद्यालय व पावुलबुधे स्कुलच्या सहकार्यातुन घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत १०७ विद्यार्थ्यांनी लस घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीचा पहिला डोस देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती कुल्लाळ यांनी सांगितले की लसीकरणा बरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमाचे सर्वांनी पालन करायला हवे . जेणेकरून आपण कोरोना विषाणूला हद्दपार करू शकतो.
यावेळी सरपंच सविता गायकवाड, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.पुनम दातिर ,डॉ.सुनिता ओटी रायपेल्ली , मनिषा उकिरङे ,आशा फुंदे व श्री. चांगदेव विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती कुल्लाळ मॅडम दिकोंडा मॅडम , सुनिल म्हस्के सर ,नारळे सर व विद्यार्थी उपस्थित होते .

