बाळासाहेब झगडे यांची इंदापूर तालुका माळी सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: झगडेवाडीचे बाळासाहेब झगडे यांची माळी सेवा संघ इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब झगडे हे ग्रामपंचायतीचे सदस्य असून ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद त्यांनी भूषवलेले आहे. महात्मा फुले ग्रुप चे अध्यक्ष म्हणून गावात मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांची सामाजिक कामाचे असणारी आवड लक्षात घेऊन त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीनंतर सेवा संघाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय ( भाऊ ) माळी, सल्लागार एडवोकेट नितीन राजगुरू , राज्य उपाध्यक्ष बालाजी माळी, राज्य उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उमेश गायकवाड, तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, महिला अध्यक्ष वर्षाताई भोंग यांनी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, निराभीमा सहकारी साखर कारखानाचे व्हॉईस चेअरमन कांतीलाल झगडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उपसरपंच मच्छिद्र झगडे, युवा नेते रणजित झगडे, ओंकार झगडे, संतोष झगडे, महेश झगडे, अक्षय झगडे, मा .सरपंच प्रशांत झगडे तसेच गावातील माजी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य आणि गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अशी माहिती माळी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख श्री नानासाहेब ननवरे यांनी दिली.

