गोखळी येथे संजय गांधी निराधार योजना संदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन व फॉर्म वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी ग्रामपंचायत या ठिकाणी संजय गांधी निराधार योजने च्या पात्र लाभार्थ्यांसाठी फॉर्म वाटप व योजनेची माहिती व मार्गदर्शन संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी (दि. ७) रोजी केले.
तर गोखळी चे उपसरपंच सचिन तरंगे यांनी सांगितले की, गोखळी गावातील लाभार्थ्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना योग्य तो लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या जाईल.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अनेकांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी गावातील सरपंच अलका पोळ, उपसरपंच सचिन तरंगे, चेअरमन बाळासाहेब चितळकर, ग्रामसेविका अस्मिता गायकवाड माऊली वाघमोडे, बजरंग राऊत, बापू पोळ, लक्ष्मण हरणावळ, राघू पारेकर, सोमनाथ झगडे, संतोष जाधव सरपंच तरंगवाडी, उपसरपंच कांतीलाल तरंगे , सुहास बुटे, प्रदीप वाघमोडे, महारनवर गुरुजी ,महादेव वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.

