shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ. निरजा ताई आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २०२२ चा पुरस्कार देऊन सन्मानित..!


औरंगाबाद I प्रतिनिधी :  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त.अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने सौ.निरजाताई आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त २०२२ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक उपक्रम, महीलावर अन्याय अत्याचार , भ्रष्ट चार अशा माध्यमातून निरजाताई आंबेरकर यांनी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.आणि सतत अहोरात्र समाज सेवा. करण्यासाठी झटत असतात.म्हणुन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने पुरस्कार साठी निवड करून सन्मानित केले.

 यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्ती पर गीत , हम सब एक है, हि एक अतिशय सुंदर नाटिका व एक उत्कृष्ट डान्स अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केला.तसेच महीला लघुउद्योगा संदर्भात महीलां ची  होत असलेली फसवणूक करणाऱ्या च्या विरोधात आवाज उठावून महीलांच्या न्याय देण्यासाठी प्रयत्न केला.' एक घास आपूलकीचा, टिमच्या  संस्थापक अध्यक्षा सौ, निरजा रुपेश आंबेरकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेध्याक्ष रविंद्र दादा जाधव व समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले.
close