अहमदनगर (शौकतभाई शेख): - ४० टक्के अनुदानित असलेल्या शाळांना नियमित वेतन व फरक बिले मिळण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने माध्यमिक विभागाच्या वेतन अधीक्षकांना देण्यात आले,
४० टक्के अंशत: अनुदानित माध्यमिक शाळेचे वेतन थकलेले असताना सदर शाळांना तीन महिन्याचे फरक बिल व नियमित वेतन अदा करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे, तसेच माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणीही संघटनेच्यावतीने माध्यमिक विभागाच्या वेतन अधीक्षक स्वाती हवेले यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे,
कोरोनामुळे सर्वच क्षेत्राची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शिक्षक देखील आर्थिक विवंचनेत आहे,शासनाकडून नियमित वेतना व्यतिरिक्त इतर देयकांसाठी अनुदान प्राप्त होत नसल्याने शिक्षकांची अनेक देयके प्रलंबीत आहेत,त्यामुळे इतर देयके मिळण्यास उशीर होत असून शिक्षक वर्गाची निधी अभावामुळे देयके मिळण्यास परवड होत आहे,
शिक्षकांची प्रलंबीत देयके मिळण्यासाठी तात्काळ निधी कम मागण्याची तात्काळ दखल घेऊन सर्वतोपरी सहकार्य करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले,यावेळी शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे समवेत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इकबाल काकर, उपाध्यक्ष इब्राहिम बागवान, फिरोज पठाण ,सचिव आरिफ शेख,कार्याध्यक्ष शहनवाज गुलाम,टीडीफचे अरबाज पठाण, आदी उपस्थित होते.

