भारताची राज्यघटना जगात आदर्श-हर्षवर्धन पाटील
- नीरा भीमा कारखान्यावर प्रजासत्ताक दिन उत्साहात
फोटो:- निरा भिमा साखर कारखान्यावरती प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ध्वजारोहण केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
इंदापूर :प्रतिनिधी दि.26/1/22
भारत देशाची राज्यघटना जगामध्ये आदर्श राज्यघटना म्हणून ओळखली जात आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो नागरिकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन प्रत्येक नागरिकाने देशाचे नाव उज्ज्वल करणेसाठी झटले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शहाजीनगर येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बुधवारी ( दि.26) ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या सुरक्षा दलाने मानवंदना दिली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील म्हणाले, भारत आज जगात महासत्ता म्हणून उदयास येत आहे.आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी दि. 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जात आहे.
देशाने गेली 72 वर्षात संरक्षण, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, सहकार, क्रीडा, कृषी, जलसिंचन, दळणवळण, औद्योगिक, सांस्कृतिक आदी अनेक क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे. तरीही देशासमोर बेरोजगारी, वाढते शहरीकरण यासारखी संकटे आहेत, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी तालुक्याचे 55 वर्षे नेतृत्व करीत तालुक्याच्या विकास केला. नीरा-भीमा कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. या परिसराच्या विकासात कारखान्याचा सिंहाचा वाटा आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांनी केले. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, मोहन गुळवे, माणिकराव खाडे, के. एस. खाडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
____________________________

