तृप्ती देसाई यांनी ह.भ.प इंदुरीकर महाराजांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा समाजकार्य करून प्रसिद्धी मिळवावी- जितेंद्र माळवदे (तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी ओबीसी युवामोर्चा तालुका)
शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी । प्रतिनिधी :-
अनेक दिवसांपासून तृप्ती देसाई यांचे महाराष्ट्र मध्ये नको असलेले उद्योग सुरू आहेत. कधी महाराष्ट्रातील मंदिर तर कधी इंदुरीकर महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्रातून तृप्ती देसाई यांच्या मागे नक्की हात कोणाचा आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह भ प इंदूरीकर महाराज महाराष्ट्र मध्ये समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे.
बालकामगार, शेतकरी, शेतमजूर, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, बेटी बचाव, दारूबंदी, व्यसनमुक्ती, स्वयंरोजगार, स्त्री-पुरुष समानता, अशाप्रकारे अनेक समाज हिताचे व समाज प्रबोधनाचे कार्य इंदुरीकर महाराजांचे चालू आहे व यापुढेही चालू राहील. पण मग यापैकी कोणते कार्य तृप्ती देसाई यांनी केले, असे कोणते एक तरी काम आहे की जे समाज हिताचे आहे आणि ते त्यांनी केलं हे त्यांनी सांगावे.
तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीसाठी सुरू केलेले नकोते उद्योग थांबवावेत. आणि समाजहिताच्या कार्याकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्र मधील अनेक युवक, शेतकरी, वारकरी यांच्यामध्ये तृप्ती देसाई बद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रभूषण समाजप्रबोधनकार ह भ प इंदूरीकर महाराज यांनी आता न डगमगता आपले समाज प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवावे, महाराष्ट्रातील तमाम जनता आपल्या पाठीशी उभी आहे. आज ही वेळ इंदुरीकर महाराजांवर आली आहे उद्या अनेकांवर ही वेळ येऊ शकते, म्हणून अशा प्रकारच्या समाज विघातक वृत्तीला वेळेवर रोखले पाहिजे.
आता यापुढे ही जर इंदुरीकर महाराजांवर अशाच प्रकारे कारवाई सुरू राहिली तर आमच्या संयमाचा अंत राहणार नाही. महाराजांनी शाकाहारी आहार उत्तम आहार असे म्हणणे आणि वारकरी संप्रदायाची प्रशंसा व प्रसार करणे यात काही चुकीचे नाही...!

