छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थनार्थ इंदापुर तहसील समोर सकल मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण.


इंदापूर प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इंदापूर तहसील कार्यालया बाहेर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक भाषणे व मराठा समाजाच्या  मागण्यांसाठीच्या आक्रोशाने इंदापूर तहसील कार्यालया बाहेर चा परिसर आज दणाणत आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा देत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्यशासनावर टीकास्त्र सोडत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.संभाजीराजांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे यांचे उपोषण सुरू झाले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तहसील कार्यालया बाहेर सकल मराठा समाजातर्फे लाक्षणिक उपोषण सुरू झाले आहे.आज इंदापूर तालुक्यातील ग्रामीण शहरातील  कार्यकर्त्यांनी एकत्र  येऊन पाठिंबा दर्शवला.तसेच त्यांनी सडेतोड भाषणे करत मराठा समाजाच्या व्यथा मांडत आरक्षणाची मागणी केली आहे.

या ठिकाणी शेकडो मराठा बांधवांनी एकत्र येऊन ठिय्या मांडला आहे.