shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मै झुकेगा नहीं लघुचित्रपटाचे चित्रीकरण संप्पन्न...!

मुंबई । प्रतिनिधी:-
धर्मा फिल्म्स निर्मित मै झुकेगा नही ह्या शॉर्ट फिल्म चे चित्रीकरण मेळघाट मधील  बिजुधावडी परिसरात झाले. ह्या वेळेस सुद्धा धर्मा वानखडे यांनी  आरोग्य हा विषय निवडत क्षयरोग या विषयावर लघुपट निर्माण केला आहे. 

     लघुपटाचे लेखक व दिगदर्शक  धर्मा वानखडे असून निर्माता बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ दिनेश अंभोरे असून त्यात त्यांनी अभिनय  पण केला आहे. 

        सहा दिगदर्शक आणि संकलन भारत वानखडे यांचे असून कार्यकारी निर्माता आरोग्य सहायक चंदू काळे आहेत. सिनेमॅटोग्राफर अक्षय खल्लरकर, आर्ट दिगदर्शक किशोर इंगोले व सुरेश तऱ्हेकर  यांचे  आहे. या लघुपटात डॉ दिनेश अंभोरे,धर्मा वानखडे, निलेश कथे, वसंत उके, सोनाली सरदार , व बालकलाकार वंशिका इंगळे, सुनील पाटणकर असून, व्यवस्थापन आर्यन वानखडे यांचे आहे. सदर लघुपट सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शाशन तर्फे  घेण्यात येणाऱ्या  महा आरोग्य लघुपट स्पर्धेत पाठवण्यात आलेला आहे.

close