shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपंग सुनिल गंगाराम शिंदे यांचा आदर्श घेण्यासारखा..! एकतीस वेळा केले रक्तदान..!!


प्रतिनिधी । सुनिल ज्ञानदेव भोसले:-
आंबेगाव:- आंबेगाव मधील एका समाजसेवकाची धाडसी कार्य.. त्याने शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह दिलेली मुलाखत..

आंबेगाव तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव मंचर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले सुलतानपूर गावी अशिक्षित शेतकरी कुटुंब विमल गंगाराम शिंदे यांच्या पोटी माझा जन्म झाला. वयाच्या पाचव्या महिन्यातच पोलिओ झाला जो संघर्ष वाट्याला आला तो आजपर्यंत चालू आहे.

 शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत झाले त्यानंतर तीन किलोमीटर मंचर याठिकाणी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीला असताना पुणे- नाशिक हायवे वरती अपघात झाला. अपघातात पाय मोडला. एक महिना दवाखान्यात दोन महिने घरी बरा झालो. मामांनी पुण्यात आणलं. छोटी मोठी काम करून आपला उदरनिर्वाह करत राहिलो. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्याने दिव्यांग बांधवांसाठी काम करायला सुरुवात केली. आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो.यासाठी निर्पेक्ष भावनेने काम चालू केले. माझे बरोबर काम करणाऱ्या मित्राचा अपघात झाला. मित्राला रक्तस्राव झाल्याने मित्राला रक्ताची गरज पडली. माझं वय 23 होतं. त्यावेळी मित्राला रक्तदान करून मित्राचा जीव वाचवला.

आज पर्यंत एकतीस वेळा रक्तदान केले आहे. शिवजयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सुभाषचंद्र जयंती, महात्मा गांधी जयंती, गणेश जयंती यानिमित्तानं वर्षातून चार वेळा रक्तदान करत आहे. करोनाच्या महामारीत माझ्या मुलीचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला आहे.

दिव्यांगा साठी मदत सेवा निस्वार्थपणे सोळा वर्षे चालू आहे. कोरोनाच्या महामारीत दिव्यांग बांधवांना किट वाटप केले आहे.
                                         असाच एक प्रसंग भयानक घडला. संध्याकाळी घरी जाताना पीएमटी बस मधून अचानक पणे दूर येऊ लागला ते बस चालकाच्या लक्षात आले नाही. मी बस चालकाच्या लक्षात आणून दिल्यामुळे चालकाने बस थांबवली आणि पुढील होणारा अनर्थ टाळला व दुर्घटना टळली.
 या सदरते बद्दल दिव्यांग बांधवाने शिंदे यांचे प्रवासी व चालक यांनी आभार मानले.करोणाच्या महामारीत केलेल्या कार्यामुळे आमच्या ग्रामपंचायत सुलतानपूर कोरोना योध्दा म्हणून  गौरवण्यात आले,तसेच रक्ताचे नाते ट्रस्टच्या वतीने रक्तदान चळवळीत केलेल्या कार्यामुळे गौरवण्यात आले. रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शंकर मठ समाधी ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिरात गौरवण्यात आले.
close