पूर्णा । प्रतिनिधी:- पूर्णा ते चुडावा दरम्यान गोविंदपुर शिवारामध्ये रेल्वे इंजिनच्या धडकेत मध्ये एका अज्ञात मनोरुग्ण इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 फेब्रुवारी च्या रात्री घडली अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील गोविंद परिसरामध्ये रविवारी सायंकाळी अज्ञात नावाचा मनोरुग्ण गावांमध्ये फिरत होता. त्याला नाव विचारले असता तो काहीही सांगत नव्हता. परंतु रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान गावालगत असलेल्या पूर्णा ते चुडावा या लोहमार्ग कडे गेला असता मध्यरात्री अज्ञात रेल्वेच्या इंजिनने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झााला.
दरम्यान या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील पंकज लोखंडे यांनी पोलिसांना दिली. चुडावा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला व अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वय असलेल्या मयताच्या मृत्यूप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास चुडावा पोलीस करत आहेत.

