पूर्णा । प्रतिनिधी :-
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे यांनी उपोषणाला शनिवार २६ फेब्रुवारी पासून सुरुवात केली आहे त्यांच्या आंदोलनाला सर्वत्र विविध संघटना आणि मराठा बांधवाच्या वतीने पाठिंबा दर्शवला जात आहे.पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे या गावातील तुकाराम ढोणे यांनी जलकुंभावर उपोषणास बसुन उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
जो पर्यंत खासदार संभाजीराजे यांचे उपोषण सुरू आहे, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा तुकाराम ढोणे यांनी घेतला आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सरकारने वेळ काढू पणा केला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी उपोषणाला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील पांगरा ढोणे गावांमध्ये ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे मात्र गावातील तुकाराम ढोणे या व्यक्तीने गावाच्या सुमारे सत्तर ते ऐंशी फुटाच्या जलकुंभावर ढून खासदार संभाजीराजे भोसले यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला पाठिंबा दिला आहे जोपर्यंत खासदार संभाजी राजे हे आधार मैदानावर आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत तोपर्यंत आपण जलकुंभा वरून खाली उतरणार नसल्याचे पवित्रा घेतला आहे.
पांगरा ढोणे येथील विठ्ठल कदम बबनराव ढोणे मुंजाजी ढोणे संतोष ढोणे रामेश्वर हलांडे अंगद ढोणे जगदीश ढोणे गोपाळ ढोणे बालाजी ढोणे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी गावामध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे.

