पूर्णा:- खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्याचे पडसाद राज्यासह देशातही उमटत आहेत कालच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी लेखी पत्राद्वारे आपला पाठिंबा दर्शविला तर आज मराठा समाजातील सर्वात आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाणारी अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संभाजीराजेंना भेटून जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, कार्याध्यक्ष भीमराव मराठे, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर,प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी विजय घाडगे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, प्रदेश सल्लागार भगवानदादा मागणे व आदी पदाधिकारी उपस्थित होते. छावा संघटना गेल्या अनेक वर्षांपासून मराठा चळवळीतील प्रमुख संघटना म्हणून ओळखली जाते, संभाजी राजें सोबत सर्व मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देतील तसेच या राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय दिला नाही तर या सरकारने मराठा समाजाच्या रोषास सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.असे प्रतिपादन संघटनेचे प्रमुख नानासाहेब जावळे पाटील यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना केले.तर संघटनेचे वि.आ. जिल्हाध्यक्ष विशाल सुर्यवंशी यांनीही पूर्णा येथून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठा समाज हा पूर्ण ताकदीनिशी संभाजीराजे यांच्यासोबत आहे सरकारने लवकरात लवकर सर्व मागण्यांचा विचार करून त्या अंमलात आणाव्यात अथवा तळागाळातील मराठा सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.
-विशाल पा. सुर्यवंशी कळगावकर
(समनव्यक मराठा क्रांती मोर्चा)

