शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
राहुरीतील पिंप्री अवघड गावात असाही जगा वेगळा अनोखा विवाह सोहळा पार पडला..!!
राहुरी :
“असं म्हणतात..! की रेशिमगाठी या जन्माला येतानाचं स्वर्गातुन बांधून येत असतात”
याचाचं प्रत्यय नुकताच राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड या गावामध्ये आलाय.! पिंप्री अवघड गावातील संजय भिवाजी लांबे पाटील यांची लाडकी कन्या पूनम ची जन्मताच उंची ही फार कमी त्यामुळे आपल्या कन्येच्या विवाह बाबत चिंता सदैव उराशी.? समाजामध्ये वावरत असताना बालपणी उंचीने कमी असणाऱ्या पूनमला देखील काहीसा मानसिक त्रास सहन करावा लागला परंतु ती कधी या गोष्टींना डगमगली नाही…
तर समोर आलेल्या अडचणींना ठामपणे तिने सामना दिला तसेच कुटुंबीयांनी देखील तिचा धीर कधी खचु दिला नाही.! उंची कमी असल्यामुळे आपले पुढील आयुष्य कसे जाईल.? आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा मिळेल.? या सर्व प्रश्नांची घालमेल तिच्या काळजात नेहमी चालत असे. परंतु म्हणतात ना “रेशीमगाठी या जन्माला येतानाचं स्वर्गातुन बांधून आलेले असतात” अगदी त्याचाचं प्रत्यय येत ‘तो’ अविस्मरणीय सुवर्णक्षण तिच्या आयुष्यात आला..!!
राहुरी तालुक्यातील कानडगाव या ठिकाणी राहणारे रावसाहेब लहानु गागरे पाटील यांचे चिरंजीव राकेश याची देखील उंची कमी असल्यामुळे त्यांच्या देखील डोळ्यासमोर तिच अडचण असताना एका कार्यक्रमात कानडगाव येथील गागरे पाटील आणि पिंप्री अवघड येथील लांबे पाटील या दोन्ही कुटुंबीयांची भेट घडून आली आणि त्यात चर्चा झाली होती.
जगामध्ये नेहमी एक विचारांची..! एक अडचणीची..! माणसेचं एकत्र येतात तशाच पद्धतीचा उंची फार कमी असणारी पूनम आणि उंची फार कमी असणारा राकेश या दोघांनी देखील एकमेकांसोबत विवाह करण्यासाठी पसंती दर्शवली. खर तर पूनम ही राकेशसाठी आणि राकेश हा पुनमसाठीचं जन्माला आले असावे असं म्हणणं देखील वागवे ठरणार नाही.! दोघांचे दुग्धशर्करा योग जुळून येत छत्तीस गुण जुळले गेले आणि..!!
या दोघांचा हा जगा वेगळा विवाह सोहळा नुकताच मोठ्या धामधुमीमध्ये पिंप्री अवघड या गावांमध्ये संपन्न झाला आहे. या दोन्ही नव वधु वर दाम्पत्यांची ही जोडी मंडपामध्ये एकदम झकास शोभून दिसत होती. या विवाह सोहळ्यात प्रसंगी दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक मित्रमंडळी तसेच पिंप्री अवघड ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शुभाशीर्वाद दिले..!!
✒️Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

