शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२२
अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित नागवडे साखर कारखाना बंद करण्याचे आदेश..!!
नागवडे कारखान्यातील मळी साठवण टाकी फूटली..!!
श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळी साठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटली. या घटनेत युमारे चार हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली.
ही घटना गुरुवारी (ता. १०) पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत कारखान्याचे साडेचार कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या नागवडे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखाना साखरेबरोबर उपपदार्थ तयार करतो. कारखान्याच्या अर्कशाळा विभागात टाक्यांमध्ये मळी साठवण्यात येते. गुरुवारी पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान वाढल्याने ही टाकी अचानक फुटली.
या टाकीची साठवण क्षमता साडेचार हजार मेट्रिक टनाची असून या टाकीत चार हजार १०० मेट्रिक टन मळी साठविलेली होती. टाकी फुटल्याने हजारो लिटर मळी वाहून गेली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
श्रीगोंदा साखर कारखान्याची मळीची टाकी फुटल्याने साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत घुसली. याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान परिसरातील शेतीसह नागरी वस्तीला प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेत MPCB नाशिक विभागीय कार्यालयाने कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहे.
या घटनेत कारखान्याची संरक्षक भिंतदेखील कोसळली. या दुर्घटनेत कारखान्याचे साडेचार कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

