shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चाकाटी ग्रामपंचायतीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांची भेट.

चाकाटी ग्रामपंचायतीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांची भेट.

विविध विकास कामांची पाहणी व शौचालयाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून चाकाटी गाव स्वच्छ सुंदर बनणार - सरपंच संजय रुपनवर.
इंदापूर प्रतिनिधी: दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी इंदापूर तालुक्यातील चाकाटी ग्रामपंचायत येथे विविध विकास कामांची पाहणी व सार्वजनिक शौचालयाची भूमिपूजन, वृक्षारोपण, रोजगारहमीतील कामांची पाहणी तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी व मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा स्वच्छता पुणे यांच्या उपस्थितीत तसेच गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्ताराधिकारी युनूस शेख, इंदापूर पंचायत समितीचे काळे, सोलापुरे तसेच तालुक्यातील ग्रामसेवक , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, सरपंच संजय रुपनवर, चाकाटीचे ग्रामसेवक स्वप्निल गायकवाड,समाधान घोडके,केशव (काका) मारकड, सोपान मारकड, उमेश जाधव, मारुती वाघमोडे, मेजर रामभाऊ ननवरे, गणपत मारकड, चंद्रकांत मारकड महिपती मारकड इत्यादी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील चाकाटी गाव हे विकासाचे मॉडेल बनवू  लागले असून गावामध्‍ये विविध विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे, इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गावासाठी अनेक विकास कामे मंजूर होत आहेत. तर काही कामे पूर्ण तर चालू आहेत. अशी माहिती सरपंच संजय रुपनवर यांनी दिली ते पुढे म्हणाले की, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले असून झाडेही मोठी झाल्याने गावामध्ये प्रसन्न वातावरण दिसून येत आहे. तरी गावात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा धडाका लावला असून  चाकाटी गाव वृक्षप्रेमी बनू लागले  आहे. आता हेच गाव स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श मॉडेल बनू लागले असून गावात घनकचरा व्यवस्थापन शेड उभारले असून ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी लागणारी साधन सामुग्री व तीन चाकी वाहन इत्यादी ची आवश्यकता असून  लवकरच खरेदी व्हावी या संदर्भात याठिकाणी सूचना करण्यात आल्या तसेच ही व्यवस्था लवकर करून स्वच्छ सुंदर चाकाटी करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेत आहे. गावामध्ये  घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्यासाठी स्वच्छ पाणी व मोफत दळण दळून देण्याची सेवा तसेच अंतर्गत रस्ते, गटारी इत्यादी कामे पूर्ण झाली तसेच काही चालू आहेत तर काही मंजूर व प्रस्तावित आहेत अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू असल्याने आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी चाकाटी गाव पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्ताराधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामसेवक यांची उपस्थिती गावात दिसून आली व झालेल्या कामाचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती चाकाटी गावचे सरपंच संजय बबन रुपनवर यांनी दिली.
दिनांक १० फेब्रुवारी रोजी  संजय बबन रुपनवर यांची चाकाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी एक वर्षाची वर्षपूर्ती झाली त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन  यावेळी करण्यात आले.
ग्रामपंचायत उपसरपंच शुभांगी तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य हर्षाली मारकड, आबासाहेब मारकड, पारूबाई जाधव, मनीषा रुपनवर यांनी सर्व अधिकारी ग्रामसेवक गाव पाहणीसाठी आल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या.
close