प्रतिनिधी : आसावरी वायकर

नारायणडोहो : ४ / 
नगर तालुक्यातील नारायणडोहो या ठिकाणी महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले   श्री क्षेत्र भगवान महादेव व योगिराज चांगदेव महाराज पादुकांची मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला .

‘ मंदिर ही संस्काराची केंद्रे आणि प्रेरणास्थान असून परमेश्वराची उपासना करताना मनाची एकाग्रता हवी ‘ या संकल्पनेने तरुण वर्ग  यांनी पुढाकार घेऊन हा समारंभ उत्साहात पार पडला .
याप्रसंगी मंदिरास फुलांची सजावट, रांगोळी, मंडप यांसह विधिवत पूजा करून मंदिराभोवती कळस प्रदक्षिणा, कळस पूजन, होम-हवन, ध्वजारोहण, कळसरोहन, महाआरती, प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.

 हर हर महादेव या जयघोषात मंदिरावरचे शिवमंदिराचे कलश रोहन  विरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने करण्यात आले.
या सोहळ्यास परिसरातील शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवपूजा व प्रसादाचा लाभ घेतला. 

यावेळी नारायणडोहो पंचक्रोशीतील शिवभक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.