प्रतिनिधी : आसावरी वायकर
शेवगाव : ४ / शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावात सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज यांच्या तेराव्या पुण्यतिथी सोहळ्याला हजारो साधकांनी हजेरी लावली. स्वात्मसुखनिवासी विठ्ठलनाथ महाराजांची समाधी असलेल्या आनंद साधकाश्रम गर्दीने फुलून गेला होता. दरवर्षी प्रमाणे यंदाही विठ्ठलनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे यांच्या कृपाशीर्वादाने तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन जगदंबा माता भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी केले आहे.
पहिल्या दिवशी हंसानंद स्वामी यांचे हरिकीर्तन झाले तर गुरुवार रोजी पुण्यतिथीनिमित्त सकाळी रामायणाचार्य चांगदेव महाराज काळे यांचे संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखें नाहीं तेथें, साधु थोर जाणा साधु थोर जाणा, साधु थोर जाणा कलियुगीं या नामदेव महाराजांच्या अभंगावर सुश्राव्य हरिकीर्तन झाले. यावेळी काळे महाराज म्हणाले, विठ्ठलनाथ महाराज महान तपस्वी होते. त्यांच्यासारख्या संतांचा सहवास लाभणे व संतसेवा करावयास मिळणे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. जगदंबा माता भजनी मंडळाच्या सांप्रदायिक चाली व सुमधुर गायनाने कीर्तनात आणखी रंग भरला.
यावेळी भावीनिमगाव जगदंबा माता भजनी मंडळाचे दत्तात्रय महाराज काळे, सिताराम महाराज चेडे, बाबासाहेब महाराज चव्हाण, गायनाचार्य गोरक्षनाथ महाराज काळे, राजेंद्र राजगुरू, गंगाराम शेळके, कांता जरे, गणेश वाकळे, शंकर घनवट, श्रीधर काटे, शिवाजी शेळके, संदीप कापरे, नाना शेळके, मृदंगाचार्य विलास महाराज चव्हाण, किसनराव जाधव, भारत पारखे, कडुबाळ कुचे, बाबासाहेब घनवट, पुंजाराम शेळके, अंकुश शिंदे आदींसह ग्रामस्थ व साधकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

