प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा : ४ / सांगोला -टेंभुर्णी येथील दरोड्यातील दोन वर्षापासून फरार असेलेल्या आरोपीस करमाळा पोलिसांनी शिताफीने पकडले आहे .
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की केम परिसरात यात्रे मध्ये आरोपी सुनील अर्जुन जाधव वय 28 रा . उपळवाटे ता .माढा हा आरोपी सांगोला व टेंभुर्णी येथे दरोडा टाकून दोन वर्षापासून फरार असून तो केम मध्ये आला असल्याची माहिती मिळाली .पो. नि . कोकणे यांनी लागलीच पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ अमोल जगताप , सोमनाथ जगताप यांचे पथक रवाना केले. या पथकाने केम मध्ये एका हॉटेलमध्ये सापळा रचून सदर आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले .
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली .

