shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाचपुते यांच्यामुळे चिचोंडीत विकासपर्व ; भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांचे प्रतिपादन


प्रतिनिधी : आसावरी वायकर

नारायणडोहो : ४ / नगर - श्रीगोंदा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री.बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून चिचोंडी पाटील गावामध्ये कोट्यवधी रुपयांचे विकासकामे मंजूर असून या कामांमुळे गावामध्ये विकासपर्व सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी केले.

ग्रामविकास विभागाच्या लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत मंजूर झालेल्या १० लक्ष रुपयांच्या नगर - जामखेड रोड ते श्रीकृष्ण मंदिर पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ गावातील आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी बोलताना सरपंच कोकाटे यांनी सांगितले की, वर्षोनुवर्षे प्रलंबित असलेला सदर रस्ता हा बाजारपेठेकडे जाणारा गावातील प्रमुख रस्ता असल्याकारणाने सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची होती. ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून सदर रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे निधीची मागणी केली होती. व त्यासाठी तात्काळ १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे केले.

यावेळी सदर रस्त्यासाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ शिक्षक नेते कल्याण ठोंबरे, माजी सरपंच अमोल कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे, संदीप काळे, अतुल पवने यांनी आमदार पाचपुते यांचे मनोगत व्यक्त करून आभार मानले.

भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच कल्पनाताई ठोंबरे, राष्ट्रवादीचे तालुका कार्यध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई चौधरी, जयश्रीताई कोकाटे, यशोदाताई कोकाटे, सविताताई खराडे, वैभव कोकाटे, संदीप काळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, भाऊसाहेब बेल्हेकर, प्रकाश कांबळे, दत्तात्रय धुळे, दीपक हजारे यांच्यासह  जेष्ठनेते बाजीराव अण्णा हजारे, पांडुरंग ससे, कल्याण ठोंबरे सर, आर एस कोकाटे, बाळासाहेब ठोंबरे, अमोल कोकाटे, महेश काका जगताप, भाऊसाहेब हजारे, बाबासाहेब नालकुल, भाऊसाहेब ठोंबरे, मेहमूद शेख, कासम शेठ, विजय कोकाटे, गजानन शेंदूरकर, रमेश ठोंबरे, संजय ठोंबरे, चक्रपाणी ठोंबरे, अतुल पवने, गंगा कोकाटे, गणेश इंगळे, ताज महंमद शेख, नामदेव कोकाटे, पांडुरंग इंगळे, लिंबराज हजारे, एकनाथ कैदके, एकनाथ कोकाटे, चिंटू पाटेकर, दत्ता वाडेकर, गफूरभाई, बाबूशेठ, संपत हजारे, विजय गाडे, राहुल पवने, सचिन खडके, बाप्पू कोकाटे, अनिकेत जगताप, संतोष कोकाटे, अरुणाताई शेंदूरकर, रेखाताई दिलवाले, नालकुल ताई, ग्रामसेवक देविदास मोरे, राजू तनपुरे, बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते.
close