संकटातही मुद्रित माध्यम टिकून आहे कारण लोकांचा विश्वास अजूनही वर्तमानपत्रावर दृढ विश्वास आहे.
--- नामदेव दादा क्षिरसागर
पत्रकार समाजासाठी झटत असतात मात्र त्याची समाज दखल घेत नाही
-- दिलीप ख्रिस्ती
--------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
दर्पण दिन व मुकनायक दिन निमित्त आदर्श पत्रकार समिती केज यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दै चंपावती कार्यालयात पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष हे दै. लोकप्रश्नचे संपादक दिलीप ख्रिस्ती हे होते तर जेष्ठ पत्रकार दै. चंपावतीपत्रचे नामदेव दादा क्षिरसागर, दै. रणझुंजारचे राजेंद्र आगवान, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, भीमराव आखाडे, दिपक सर्वज्ञ आणि पत्रकार सुधाकर पोटभरे प्रमुख पाहुणे होते.
जेष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर (दै. सुराज्य) यांचा आदर्श जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर अनिल वाघमारे (संपादक, डोंगराचा राजा) यांना आदर्श सोशल मीडिया पुरस्कार, पत्रकार दत्ता देशमुख (दै. सकाळ) यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार, सुशील देशमुख (दै. लोकप्रश्न) यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मान चिन्ह, शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे नामदेव दादा क्षिरसागर म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रात अनेक स्थीतंरे झाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या भाऊगर्दीही मुद्रित माध्यमांवर व वर्तमानपत्रावर लोकांचा दृढ विश्वास कायम आहे. पत्रकारांनी विश्वासार्हता कायम ठेवल्यास त्यांचा दबाव कायम टिकविला जाऊ शकतो. आता सोशल माध्यमांच्या माध्यमातून पत्रकारितेला नवे पंख फुटले असून नवीन आयाम मिळाला आहे. त्यासाठी पत्रकारांनीही काळा बरोबर बदलायला हवे. असे त्यांनी मार्गदर्शन केले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप ख्रिस्ती यांनी सांगितले की, पत्रकार हा सर्वांसाठी आणि समाजासाठी अहोरात्र कष्ट घेतो. परंतु समाजाकडून त्याची दखल घेतली जात नाही. ही शोकांतिका आहे. पत्रकारांनी स्वतःप्रति प्रामाणिक राहून काम करावे. असे विचार व्यक्त केले.
पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने अनिल वाघमारे आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित सर्वोत्तम अण्णा गावरस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष अशोक सोनवणे, प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, विजयराज आरकडे, सचिव गौतम बचुटे, प्रकाश मुंडे, बळीराम भोसले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा हनुमंत भोसले यांनी तर सूत्रसंचलन गौतम बचुटे यांनी आणि आभार विजयराज आरकडे यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श पत्रकार समितीचेअध्यक्ष अशोक सोनवणे, कार्याध्यक्षा सौ. रत्नमालाताई मुंडे, प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, सुहास चिद्रवार, विजयराज आरकडे, सचिव गौतम बचुटे, शुभम खाडे, अमोल जाधव, प्रकाश मुंडे, धनंजय घोळवे, बाळासाहेब जाधव, बळीराम भोसले, महादेव काळे, बळीराम भोसले, उत्तरेश्वर शिंदे, अनंत जाधव, जय जोगदंड, अक्षय वरपे, अझिम इनामदार, दीपक साखरे यांनी परिश्रम घेतले
----------------------------------------
अन्यथा बाहेर फेकले जाऊ
--- सुशील कुलकर्णी
स्व. सुनील देशमुख यांच्या नावाने देण्यात येणारा निर्भीड पत्रकारिता पुरस्कार ॲनालयझरचे संपादक सुशील कुलकर्णी यांना औरंगाबाद येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्या वेळी सुशील कुलकर्णी यांनी सांगितले की, मुद्रित माध्यमा ऐवजी आता इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमामुळे पत्रकातीतेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पत्रकारांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून काळाची पावले ओळखायला हवीत. अन्यथा आपण या क्षेत्रातून बाहेर फेकले जाऊ. असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराज आरकडे यांनी तर सुत्रसंचलन गौतम बचुटे यांनी केले. या वेळी प्रकाश मुंडे , अशोक सोनवणे, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख हे उपस्थित होते.
-----------

