वाढले बघा किती तापमान
होते अंगाची लाही लाही
उष्माघाताची लाट आली
उगाचं बाहेर पडायचं नाही ...
ऊन मी मी म्हणतय
व्हावें आता सावधान
महापूर कोरोना लाटेनंतर
वाढले धरतीचे तापमान ..
काकडी टरबूज खरबूज
सरबत दही ताकाचे सेवन
शिरावरी वस्र घेऊन
टाळा हे भयंकर ऊन ...
थांबायची जर जीवाची काहिली
काळजी घेऊ आता आपण
बिघडलेले निसर्गचक्र वाचविण्या
झाडे लावुनी वाढवूया वन ...
डॉ.अजय डवले
प्राचार्य,आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती.

